युवासेनेचा पुन्हा 130 जागांचा हट्ट; तर भाजप...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा फॉर्म्युला ठरत नसतानाच युवासेनेने मात्र, 130 जागांसाठी हट्ट धरला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून 122 जागांच्या वर एकही जागा देऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा फॉर्म्युला ठरत नसतानाच युवासेनेने मात्र, 130 जागांसाठी हट्ट धरला आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून 122 जागांच्या वर एकही जागा देऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून ते 125-125 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, निवडणुका जवळ येत असल्या तरी युतीचा फॉर्म्युला काही ठरत नाही. सुरवातीला शिवसेना 144 जागांवर अडून बसली होती असे सांगण्यात येते आहे. पंरतु आता शिवसेनेही झुकते माप घेत कमी जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, भाजपला अजूनही शिवसेनेने दिलेला प्रस्ताव मान्य नाही.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvasena wants to contest 130 seats in Assambly election