
Zakir Hussain : लहानपणापासूनच झाकीर हुसेन यांचा संगीताशी अनोखा नातं जडले होते. दुधाच्या बाटलीवर बोटं फिरवत ताल लावणाऱ्या झाकीर यांची जादू घरच्यांना लवकरच लक्षात आली. त्यांच्या वडिलांनी, पंडित अल्लारखाँ यांनी, वयाच्या तिसऱ्या वर्षी झाकीर यांना पखवाज शिकवायला सुरुवात केली. पंजाबच्या तबलावादन परंपरेतील अल्लारखाँ यांच्याकडूनच झाकीर यांना तबल्याचा पहिला धडा मिळाला.