खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं | Zomato Employee Death In Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato Employee death

खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

दिल्ली : कुटुंबियांची आर्थिक जबाबदारी खांद्यावर असलेल्या तरुणाला पोलिसाच्या हलकर्जीपणामुळे जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत कार चालवत होता. त्याने झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाच्या बाईकला धडक दिली. या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील रोहिणी येथील बुद्ध विहाराजवळ शनिवारी हा अपघात घडला. या अपघातात झोमॅटो डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ज्या कारने त्याला धडक दिली ती कार पोलिस कर्मचाऱ्याची आहे. पोलिस कॉन्स्टेबल दारुच्या नशेत वाहन चालवत असल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अटकही केली आहे.

हेही वाचा: वानरलिंगी सुळका सर करून सिंधुताई सपकाळ यांना अनोखी मानवंदना

या अपघातात जो तरुण मृत पावला तो गरिब कुटुंबियातील होता. कोरोनाच्या काळात त्याने आपल्या वडिलांना गमावले. वडिल गेल्यानंतर कुटुंबियांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली. तो घरातील एकुलता एक कमावता पुरुष होता. त्याच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपात करत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentdeathdelhizomato
loading image
go to top