
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील दहा क्रमांकाच्या लेणीतील गौतम बुद्धांच्या शिल्पावर सोमवारी (ता. दहा) किरणोत्सव झाला. या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी हजारो पर्यटक आले. मात्र, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने कोणतेही नियोजन न केल्याने, सुविधा न पुरविल्याने इतिहास अभ्यासक, लेणी संवर्धक, उपासकांनी विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला.