NDA परीक्षेसाठी 1.77 लाख महिलांनी भरला अर्ज; लष्करात होणार भरती

National Defense Academy
National Defense Academyesakal
Summary

भारतीय लष्करानं 577 महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन दिलं आहे.

NDA Exam 2021 : पहिल्यांदाच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं (National Defense Academy) प्रवेश परीक्षेसाठी महिला (Women) उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या परीक्षेसाठी एकूण 5,75,859 उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी महिला उमेदवारांनी केलेल्या अर्जांची संख्या 1,77,654 आहे. ही संख्या एकूण अर्जदारांच्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. या आकडेवारीची माहिती संरक्षण मंत्रालयानं 13 डिसेंबर 2021 रोजी संसदेत लेखी स्वरूपात दिलीय.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत डॉ. अमर पटनायक यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात ही माहिती दिलीय. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या परीक्षेसाठी महिला उमेदवारांच्या अर्जांच्या संख्येवर कोणतंही बंधन नाही, असं ते म्हणाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत वैद्यकीय चाचणीची माहितीही दिली असल्याचे भट्ट यांनी सांगितले.

National Defense Academy
विधानपरिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप; 'महाविकास'ला धक्का

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, भारतीय लष्करानं 577 महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन दिलंय. त्यामुळं महिला अधिकाऱ्यांनाही त्यांच्या युनिटचं नेतृत्व करता येणार आहे. NDA मध्ये निवडीसाठी UPSC ही परीक्षा आयोजित करत असते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एनडीएमध्ये महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार लष्कर, हवाई दल आणि नौदलात भरती होऊ शकतात.

National Defense Academy
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा फक्त 'इतके' रुपये, मिळतील 35 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com