
Study Schedule For Students: दहावी-बारावीची परीक्षा जवळ आली. विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील जाणकार देत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेपर्यंत अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे ता. ११ फेब्रुवारीपासून बारावीची; तर २१ फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉइंट्स आहेत.
त्याला साजेशी तयारी विद्यार्थी करतात. आता परीक्षा जवळ आल्यामुळे केवळ वेळात्रपकावर लक्ष ठेवून प्रत्येक पेपरवर लक्ष केंद्रित करायला हवे. प्रत्येक पेपरच्या आधीचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्या कालावधीत पाठ्यपुस्तकांची उजळणी करा, असा सल्ला देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांनी दिला.