10th & 12th Board Preparation: गणिताचा अभ्यास कसा करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काही सोप्या टिप्स 

10th & 12th Board Preparation know how to study Mathematics in simple way
10th & 12th Board Preparation know how to study Mathematics in simple way

नागपूर : गणित हा विषय म्हटलं की भल्याभल्यांना धडकी भरते. अगदी पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत आणि पुढे बारावीतही सर्वजण गणित हा विषय शिकतात. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी प्रचंड भीती असते. इतर सर्व विषयांमध्ये पास होण्याबद्दल विश्वास असला तरी विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल नेहमीच शंका असते. याच प्रमुख कारण म्हणजे अपुरा अभ्यास आणि भीती. मात्र गणित विषयात आपण सर्वाधिक मार्क्स घेऊ शकतो हेही तितकंच खरं. फक्त गरज असते ती म्हणजे उत्तम नियोजनाची आणि अभ्यासाची. म्हणूनच गणिताचा अभ्यास नक्की कसा करावा? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया  

थेयरीज आणि फॉर्मूल्यांसाठी वेगळी वही तयार करा 

गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो याचं प्रमुख कारण म्हणजे थेयरी आणि फॉर्मुले. विद्यार्थ्यांना अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत यातलं काहीही पाठ नसतं. त्यामुळे त्यांना पेपर सोडवण्यात आणि चांगले मार्क्स घेण्यात अडचणी येतात. मात्र जर तुम्हाला खरंच गणित विषयात चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुमच्या पुस्तकातील महत्वाच्या थेयरीज आणि फॉर्मूल्यांसाठी एक वेगळी वही तयार करा. या वहीत विषयाच्या अनुशंघानं फॉर्मुले लिहून काढा. यामुळे तुम्हाला हे सर्व लक्षात राहण्यास मदत होईल. तसंच परीक्षेला जाताना तुम्ही या वहीवर नजर फिरवू शकता. 

एकाच प्रकारची गणितं सोडवू नका 

गणितामध्ये अनेक विषयांवर निरनिराळ्या प्रकारची गणितं असतात. म्हणजेच एकच प्रश्न तुम्हाला वेगळ्या अर्थानं विचारू शकतात. मात्र विद्यार्थी नेहमी त्यांना सोपी वाटणाऱ्या प्रकारचीच गणितं सोडवून बघतात. जी गणितं त्यांना कठीण वाटतात त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो, तुम्हला नयेत नसलेली गणितं सोडवून बघा. तसंच एकाच धड्यातील अनेक प्रकारची गणितं सोडवून बघा. यामुळे परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गणिताचा प्रश्न आल्यास सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते सोडवता येईल. 

अभ्यासक्रमातील अधिक मार्क्स असणारे भाग निवडा 

गणितात प्रत्येक मोठ्या प्रश्नाला अधिकाधिक मार्क्स असतात हे तुम्हाला माहिती आहेच. प्रश्नाचं उत्तर जितकं मोठं तितके जास्त मार्क्स. म्हणूनच तुमच्या अभ्यासक्रमातील अधिक मार्क्स असलेलं प्रश्न आधी सोडवून बघा. यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नमागे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. मात्र लहान प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या अभ्यास क्रमातील असे काही भाग निवडा ज्यांच्यावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांना पहिले सोडवण्याचा प्रयत्न करा. 

उत्तरं स्टेप्समध्ये लिहा

गणित विषयामध्ये तंतुमच्या उत्तरपेक्षा जास्त महत्त्व तुमच्या उत्तरातील स्टेप्सना आहे. तुमची उत्तर सोडवण्याची पद्धत कोणती? तुम्ही आवश्यक त्या स्टेप्स त्यामध्ये लिहिल्या आहेत की नाही हे सर्व बघण्यात येतं. म्हणूनच गणित सोडवताना नेहमी स्टेप्समध्ये उत्तरं लिहा. अभ्यास करतानाच याचा सराव करा. मात्र अनावश्यक स्टेप्स लिहू नका. यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. 

नेहमी ग्राफ काढा 

गणित विषयामध्ये ग्राफ आणि आकृत्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच प्रश्नामध्ये ग्राफ किंवा आकृती वाढण्यास सांगितलं असेल तर नक्की काढा. यामुळे तुमचे मार्क्स वाढू शकतात. तसंच तुमचं उत्तर अधिक प्रभावी दिसेल. यासाठी अभ्यास करतानाच ग्राफ आणि आकृत्या काढण्याचा सराव करा. 

एकूणच काय तर गणित हा विषय भीतीदायक नाही. पुरेसा अभ्यास केला आणि रिव्हिजन केली तर गणितासारखा सोपी आणि भरपूर मार्क्स मिळवून देणारा विषय कुठलाच नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com