Video : 'सकाळ'चे बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : आजचा विषय - जीवशास्त्र

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 18 January 2020

जीवशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्येक धडा काळजीपूर्वक वाचा. आकृत्या काढण्याचा सराव करा.

बारावी- जीवशास्त्र
---
विषय : जीवशास्र, मार्गदर्शक : श्‍वेता लढ्ढा, पूजा नाशिककर
---
- जीवशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्येक धडा काळजीपूर्वक वाचा. आकृत्या काढण्याचा सराव करा.
- व्याख्या आणि कायदे (लॉ) तंतोतंत लिहा. महत्त्वाचे मुद्दे अभ्यासताना पुस्तकात आणि परीक्षेत उत्तरपत्रिकेत अधोरेखित करा.
- पेपर सोडविताना सेक्‍शनप्रमाणेच सोडवा. दीर्घोत्तरी प्रश्‍ने मुद्देसूद लिहा. अभ्यास करताना फ्लो चार्ट आणि ट्री डायग्रामच्या साह्याने करा.
- बहुपर्यायी प्रश्‍न सोडविताना योग्य पर्याय आणि उत्तर शब्दांमध्ये लिहा.
- प्रात्यक्षिक परीक्षेला जाताना डिसेक्‍शन बॉक्‍स, लॅब कोट, प्रवेशपत्र, जर्नल आठवणीने घेऊन जा.

Video : बारावी परीक्षेसाठी ‘सकाळ’चे मार्गदर्शन

- डिफर्मेशन बिट्विन, जस्टीफाय, गिव्ह रिझन, स्टेट द फंक्‍शन, मॅच द पेअर या प्रकारची प्रश्‍न सोडविण्याचा सराव करा.
- प्रश्‍नपत्रिका हाती पडल्यानंतर प्रश्‍न व्यवस्थित वाचा, त्याचे उत्तर आशयपूर्ण मुद्देसूद लिहा.
- परीक्षेत पाठ्य पुस्तकाबाहेरील काहीही विचारले जात नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील धड्यांखालील प्रश्‍न सोडविण्याचा सराव करा.
 

आजचा विषय : जीवशास्त्र
उद्याचा विषय : जर्मन आणि समाजशास्त्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12th exam guidance today subject Biology