पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने २०२४ मध्ये विद्यापीठात चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव ‘एनसीटीई’ला पाठविला आहे.
सोलापूर : इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना (12th Students) आता पुढील चार वर्षांत पदवी व बीएड (इंटिग्रेटेड कोर्स) अशा दोन पदव्या घेता येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Ahilyadevi Holkar Solapur University) त्यासंदर्भातील प्रस्ताव नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे (एनसीटीई) पाठविला आहे. त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरवात करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.