राज्यातील ४३३८ सरकारी प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या दहापेक्षा कमी आहे. दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांत कन्नड शाळांची संख्या अधिक आहे.
बेळगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांत (Government School) विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या चिंतेचा विषय बनला असून, विद्यार्थी नसल्याने कर्नाटकातील २,७५९ सरकारी कन्नड शाळा (Government Kannada School) बंद पडल्या आहेत. सर्वत्र कानडीकरणाचा वरवंटा फिरवणाऱ्या कर्नाटक सरकारने (Karnataka Government) शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.