ड्रीम बिग आणि बिग चॅलेंज

अभय जेरे
Thursday, 23 January 2020

मागील आठवड्यात मी ५० पेक्षा अधिक कुलगुरूंच्या समूहापुढे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये इनोव्हेशन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर व्याख्यान दिले. त्यापूर्वी मी त्यांच्याशी चर्चाही केली. यात विद्यापीठांमध्ये संशोधनांचा दर्जा कसा सुधारता येईल, यावर संवाद साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील आठवड्यात मी ५० पेक्षा अधिक कुलगुरूंच्या समूहापुढे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये इनोव्हेशन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर व्याख्यान दिले. त्यापूर्वी मी त्यांच्याशी चर्चाही केली. यात विद्यापीठांमध्ये संशोधनांचा दर्जा कसा सुधारता येईल, यावर संवाद साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पॅनलमधील कुलगुरूंनी अनेक मुद्दे अधोरेखित केले. कुलगुरूंनी आपल्या प्राध्यापकांना इतर विषयांतील संशोधनासाठीही सहकार्य करायला हवे, त्यांना चाकोरीबाहेरचा विचार करण्यासही प्रोत्साहित करावे, प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा असतील याची खात्री करावी, यासंदर्भातील मुद्दे ओळखावेत, केवळ पाश्चिमात्य कल्पनांचे अनुकरण करू नये आदी मुद्द्यांचा त्यात समावेश होता. आपण आपल्या विद्यापीठातील प्राध्यापकांना प्रकल्पांचा प्रस्ताव व्यवस्थित लिहिण्याचेही प्रशिक्षण द्यायला हवे. त्यामुळे निधी देणाऱ्या संस्थांना त्यात रस वाटेल, असे मतही एका कुलगुरूंनी मांडले. विद्यापीठातील संशोधनांचा दर्जा सुधारणे हा सर्वांच्याच काळजीचा विषय  होता. त्यामुळे सर्वांनी या चर्चेचे स्वागत केले. मीही या चर्चेचा आनंद घेतला, मात्र त्याचवेळी मनामध्ये सर्वांत महत्त्वाच्या मुद्यावर यापैकी कुणीच न बोलल्याची खंतही वाटत होती. 

जोखीम पत्करा
मी ठरवले, विद्यापीठांमध्ये इनोव्हेशन आणि उद्योजकीय प्रणाली उभारण्याची गरज या विषयावर आपण बोलायचे. यापूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेखही करायचा. त्यानुसार मी व्याख्यान दिले. मी या वेळी म्हणालो, ‘‘यापूर्वीच्या सत्रात सर्व कुलगुरूंनी संशोधनातील दर्जा सुधारण्यावर चर्चा केली. मात्र, तुम्ही सर्वांनीच सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ती म्हणजे, प्राध्यापक/संशोधकांना मोठी स्वप्नं (ड्रीम बिग) पाहण्याचे किंवा मोठी आव्हानं (बिग चॅलेंज) स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणे. आपले बहुतेक प्राध्यापक केवळ काहीतरी वाढीव काम करण्याची ध्येये ठेवतात. त्यांना अतिशय कमी महत्त्वाकांक्षा असते. बहुतेक कुलगुरू आपल्या प्राध्यापकांना त्यांच्याच संस्थेपुरते मर्यादित ठेवतात. प्राध्यापक धोका पत्करण्यास, मोठा विचार करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे कुलगुरूंनी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि एका मर्यादेपर्यंत जोखीम पत्करण्यालाही पाठिंबा द्यावा.’’ पुणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात इनोव्हेशनचा कसा वापर केला, हे आपण पुढील वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay jere article Dream Big and Big Challenge