भविष्यवेध : जीवनातील संतुलनाचे महत्त्व

खेळ, अभ्यास, नोकरी, कुटुंब, आहार, वर्तन, भावना व आर्थिक नियोजन यात योग्य समतोल साधल्यासच खऱ्या अर्थाने संतुलित, समाधानकारक व यशस्वी जीवनाचा मार्ग खुला होतो
The Art of Balance: Why 'Life Equilibrium' is the Ultimate Career Skill

The Art of Balance: Why 'Life Equilibrium' is the Ultimate Career Skill

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

खेळ किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो संतुलन राखणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारे संतुलन साधावे लागते. आपण कोणत्याही खेळाचा विचार केल्यास त्यामध्ये शारीरिक संतुलन महत्त्वाचे असतो. आपल्या पाल्याने शिक्षण सुरू असताना खेळात वेळ घालवावा की नाही? असा पालकांना प्रश्‍न पडलेला असतो. अधिकाधिक पालकांचा कल हा पाल्याने खेळ बंद करून अभ्यासाकडे लक्ष द्यावे असाच असतो. हा विचार बरोबर नाही. सतत फक्त अभ्यास करून मुलांची अभ्यासातील लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे खेळ सुरू ठेवलाच पाहिजे. एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की, अभ्यासात चांगले यश मिळविण्यासाठी प्रत्येकाने वेगळी ॲक्टिव्हिटी थोड्याफार प्रमाणात करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ कोणी खेळ, वाचन, फिरणे, मनोरंजन आदी. परंतु सगळ्यात महत्त्वाचे असते ते वेळेचे संतुलन. किती वेळा अभ्यास, किती वेळ इतर गोष्टी याचे योग्य गणित बसविले पाहिजे. ते एकदा जमले की ही चिंता कायमची दूर होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com