भविष्यातील शिक्षण प्रणाली; पारंपरिक व आधुनिकतेचा समन्वय

Adhira International School
Adhira International School

अधिरा इंटरनॅशनल स्कूल, पुनावळे
बालशिक्षण असो किंवा माध्यमिक शिक्षण, गुणवत्ता विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण असतात. त्यांच्या आधारावर ते पुढे जाऊ शकतात. हेच गुण लक्षात घेऊन त्यांच्या गतीने व त्यांच्या आवडीच्या प्रांतामध्ये वाढण्याची संधी देणे, हे शाळेचे मुख्य कार्य आहे. असंख्य शाळांमधून नेमकी शाळा शोधणे पालकांपुढील मोठी समस्या आहे. हसतखेळत शिक्षण व मुलांचा सर्वांगीण विकास करणारी एक आगळीवेगळी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन अिधरा स्कूल आपल्या भेटीला येत आहे. पुनावळे येथील अधिरा स्कूलचा घेतलेला हा आढावा. 

शाळेतील शिक्षण हे अधिक उपयोगी होण्यासाठी विविध कार्यशाळा व उपक्रमाच्या माध्यमातून अिधरा इंटरनॅशनल स्कूल मुलांसाठी अभ्यासक्रमांची आखणी करते. नो स्कूल बॅग, ब्रेन डेव्हलपमेंट कार्यशाळा, मोटर स्किल्स डेव्हलपमेंट, रेमेडियल क्‍लासेस यांसारखे उपक्रम शाळेमार्फत राबविले जातात. ज्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे ओझे न वाटता ते आनंददायी होते. त्यातूनच आदर्श व संस्कारक्षम पिढी तयार होत असते. याच प्रक्रियेचा अवलंब करून पुनावळे येथे अिधरा इंटरनॅशनल स्कूल मुलांना घडविण्यासाठी तयार झाली आहे. पिंपरी-चिंचवडचा वेगाने विकसित होणारा पुनावळे हा परिसर सध्या हॉट डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला येत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जवळच असलेले आयटी पार्क, मुंबई-बंगळूर हायवे यामुळे उच्चशिक्षित वर्ग येथे आकर्षित होत आहे. या सर्वांसाठी अिधरा इंटरनॅशनल स्कूल एक पर्वणीच ठरणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाला संस्कारांची जोड देत अभ्यासक्रमांची आखणी, अभ्यासक्रम यांमुळे शाळेचे अल्पावधितच नाव झाले आहे. शाळेच्या स्थापनेमागील हेतू, शिक्षणपद्धती यांबाबत शाळेच्या संचालकांशी साधलेला संवाद.शिक्षण ही येणाऱ्या काळातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. केवळ वैयक्तिक नव्हे, तर प्रगतिपथावरील समाज, राष्ट्र आणि जगासाठीही हे शिक्षण विशिष्ट पद्धतीने आत्मसात करायला हवे.

त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मागे धावताना पारंपरिक शिक्षणाचा हात सोडून चालणार नाही, असे ते मानतात. म्हणनूच, शाळेच्या अभ्यासक्रमाची आखणी करताना पुस्तकी शिक्षणाबरोबरच, प्रायोगिक, अनुभवाचे शिक्षण, नीतिमूल्यांचे शिक्षण याला प्राधान्य दिले आहे. मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत. मुलांमध्ये चारित्र्य, शील यांची जाणीव निर्माण व्हावी तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत, त्यांना शिस्त लागावी, अशी अपेक्षा शाळांकडून समाजाने केली, तर ती योग्यच आहे.

अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकांचे अध्यापन, परीक्षा निकालपत्रे इत्यादी चाकोरीच्या पलीकडेही शिक्षण आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हेही महत्त्वाचे आहे. हे संस्कार शाळेकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून व्हायला हवे आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेले विद्यार्थी नम्र, शीलसंपन्न, शिस्तगीर, सभ्य, सुसंस्कृत, हुशार, चौकस, स्वावलंबी, शोधबुद्धी विकसित झालेले असायला हवे आहेत, अशी अपेक्षा समाजाने केली; तर त्यात चूक नाही. आत्ताच्या पिढीकडे बुद्धी आहे. पण, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचेच आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी असून चालणार नाही, हे शिक्षण संस्थांनी लक्षात घ्यायला हवे, याच उद्देशाने अिधरा स्कूलच्या माध्यमातून नवीन आदर्श पिढी घडविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. 

खेळातून प्रगती - विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलिबॉल, स्वीमिंग, स्केटिंग, घोडेस्वारी, ॲथलेटिक्‍स, खो-खो, कबड्डी, हॅंडबॉल यांसाख्या खेळांचे प्रशिक्षण, वादविवाद, प्रश्‍नमंजूषा, पाठांतर, निबंधलेखन, हस्ताक्षर स्पर्धा यांसारखे उपक्रम.  

जीवनकौशल्ये - विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास व्हावा, यासाठी नाटक, नृत्य, कथाकथन, व्यक्तिमत्त्व विकास या माध्यमांतून मुलांना तयार केले जाते.
शालेय शिक्षणपद्धती, परीक्षांचे ओझे, याबाबत ते म्हणतात की, परीक्षा महत्त्वाची असली तरीही विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे मापन केवळ तीन तासांच्या परीक्षेत केले जाते. त्यामुळे आज गुणवत्ता यादीत आलेली बहुतांश मुले-मुली जीवघेण्या स्पर्धेला तोंड देताना दिसतात. या स्पर्धेचे स्वरूप अधिक तीव्र होत आहे आणि विशेष म्हणजे पालकही एक मार्कांसाठी मुलांवर दबाव आणतात. या स्पर्धेमधून मुलांमध्ये सहसंबंध, प्रेम, आपुलकी कमी होत आहे. म्हणूनच, या स्पर्धेतून आत्मविश्‍वासपूर्ण, स्वावलंबी, स्वाभिमानी विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शाळेची आहे. नेमके हेच कार्य अिधरा स्कूलच्या माध्यमातून केले जाणार आहे. मुलांना केवळ परीक्षार्थी बनविणे, हे आमचे ध्येय नसून त्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे आहे. ‘अभ्यास एके अभ्यास’ यावर भर न देता आकलनक्षमता व विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. 

सुरक्षित माझी शाळा - पालक आपल्या मुलांना शाळांवर विश्‍वास ठेवून शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यांचा हा विश्‍वास प्रत्येक संस्थेने सार्थ ठरविला पाहिजे, असे मला वाटते. त्यादृष्टीने अिधरा स्कूल सुरक्षेला प्रथम प्राधान्य देते. शाळा, वर्ग व शाळेच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय, शाळांच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षितच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com