

From Idea to Enterprise: The Art of Developing a Startup Concept
sakal
अद्वैत कुर्लेकर (स्टार्टअप मेंटॉर)
यशाचा पासवर्ड
‘कल्पना ही बीजासारखी असते. ती रुजवली नाही तर कधीच फुलत नाही.’ विद्यार्थी उद्योजकतेत सर्वांत मोठं आव्हान म्हणजे कल्पना शोधणं आणि ती पुढे नेणं. मागील लेखात आपण त्याच्यावर विचार केला. परंतु खरी कसोटी ही कल्पना विकसित करण्याची असते. सुरुवातीला साधी वाटणारी कल्पना योग्य पद्धतीने वाढवली तर ती मोठ्या व्यवसायात रूपांतरित होऊ शकते.