

AI is moving beyond answering questions to handling tasks, planning and decision support.
Sakal
प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
आपण ‘एआय’ला प्रश्न विचारतो आणि काही सेकंदांत उत्तर मिळते. एखादा ई-मेल लिहायचा असेल, माहिती शोधायची असेल, एखाद्या विषयाचा सारांश हवा असेल किंवा एखादी कल्पना सुचत नसेल, तर ‘एआय’ आपली मदत करते. ‘एआय’च्या जगात मोठा बदल घडत आहे. उद्याचा ‘एआय’ केवळ आपल्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, तर आपल्यासाठी अनेक टप्प्यांमध्ये विभागलेले काम स्वतः करणार आहे. यालाच ‘एआय एजंट’ असे म्हटले जाते. समजा, तुम्ही एआयला सांगितले, ‘‘मला तीन दिवसांसाठी पुण्याहून गोव्याला जायचे आहे. माझ्या बजेटमध्ये प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि फिरण्याचे नियोजन करून दे.’’ ‘एआय’ एजंट तुमच्या गरजा समजून घेईल, विविध पर्यायांची तुलना करेल, प्रवासाचे वेळापत्रक तयार करेल, राहण्यासाठी योग्य पर्याय शोधेल, खर्चाचा अंदाज काढेल आणि संपूर्ण प्रवासाचे नियोजन एका ठिकाणी देईल. म्हणजेच, आपण ‘एआय’ला ‘काय करायचे?’ एवढे सांगायचे आणि पुढची अनेक कामे ‘एआय’ स्वतः हाताळणार.