

The Irreplaceable Human Touch: Why AI Can't Replace Compassion
Sakal
डॉ. किशोर पाकणीकर
साधा, परंतु महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात येतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इतक्या वेगाने पुढे जात असताना आपले करिअर नेमके कुठे जाणार? हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा नाही, तर पालक, शिक्षक आणि समाजाचाही आहे. कारण आज आपण जे निर्णय घेतो त्यावर आयुष्य ठरणार आहे.
सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी. सगळ्या नोकऱ्या एकसारख्या धोक्यात नाहीत. काही कामे अशी आहेत जी माणसाशिवाय होऊच शकत नाहीत. उदाहरणार्थ, डॉक्टर फक्त रिपोर्ट बघत नाही, तर रुग्णाशी बोलतो आणि धीर देतो. शिक्षक विद्यार्थ्याला कुठे अडचण येते आहे हे ओळखतो. नर्स किंवा केअरगिव्हर सेवा करताना माणुसकीने वागतो. माणसामधली ही जिव्हाळ्याची आणि माणुसकीची भावना मशिनला अजून साधता आलेली नाही.