एआयपीएमएसटी (सेकंडरी २०२०) शिष्यवृत्ती प्रक्रिया

हेमचंद्र शिंदे
Tuesday, 31 December 2019

देशभरातील एमबीबीएस व बीडीएस विद्यार्थ्यांनी ‘नीट’मधून प्रवेश प्राप्त केल्यानंतर शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी देशभरात ऑल इंडिया प्री मेडिकल स्कॉलरशिप टेस्ट (सेकंडरी- २०२०) १०, १७, २४ व ३१ मे २०२० या चार स्लॉटमध्ये घेण्यात येणार असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.aipmstsecondary.co.in संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उपलब्ध आहेत.

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील एमबीबीएस व बीडीएस विद्यार्थ्यांनी ‘नीट’मधून प्रवेश प्राप्त केल्यानंतर शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी देशभरात ऑल इंडिया प्री मेडिकल स्कॉलरशिप टेस्ट (सेकंडरी- २०२०) १०, १७, २४ व ३१ मे २०२० या चार स्लॉटमध्ये घेण्यात येणार असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.aipmstsecondary.co.in संकेतस्थळावर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिष्यवृत्ती प्रक्रिया 
एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘नीट २०२०’ परीक्षा प्रथम देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिष्यवृत्तीची अपेक्षा असलेल्या विद्यार्थ्यांनी एआयपीएमएसटी परीक्षेचा फॉर्म भरून परीक्षा देणे आवश्यक आहे. 

शासकीय, खासगी महाविद्यालयांमध्ये ‘नीट २०२०’मधील मेरिट क्रमांकानुसार प्रवेश प्राप्त केल्यानंतर व सर्व प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर पात्र व अर्ज केलेल्यांना एआयपीएमएसटी परीक्षेच्या रँकच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. 

शिष्यवृत्तीची मांडणी
शासकीय एमबीबीएस अथवा बीडीएससाठी - गुणानुक्रमांकानुसार प्रथम येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेत ८५ टक्के किंवा त्या पेक्षा जास्त गुण आवश्यक, पूर्ण चार वर्षांसाठी शिक्षणशुल्काएवढी शिष्यवृत्ती मिळते. त्या नंतरचे ५०० विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत ८५ ते ७५ टक्के गुण अशांसाठी एका वर्षासाठी ट्यूशन फी एवढी रक्कम व पुढील २००० विद्यार्थ्यांना लॅपटॉप, परंतु त्यासाठी परीक्षेत ७५ ते ६५ टक्के किमान गुणांची पात्रता आवश्यक, असे शिष्यवृत्तीचे स्वरूप असते. 

खासगी एमबीबीएस, बीडीएस- शिष्यवृत्तीधारकांची संख्या म्हणजे, १००, ५०० व २००० तसेच त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमधील पात्रता गुण शासकीय प्रमाणेच आहेत. फक्त १०० विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या ५० टक्के शिक्षणशुल्क एवढी शिष्यवृत्ती, ५०० विद्यार्थ्यांना फक्त एका वर्षाच्या २५ टक्के शिक्षणशुल्क एवढी शिष्यवृत्ती मिळेल. त्या नंतरच्या २००० विद्यार्थ्यांना मात्र लॅपटॉप मिळेल.

शिष्यवृत्ती वितरण
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एआयपीएमएसटी सेकंडरी परीक्षेत किमान १० हजारांपर्यंत रँक प्राप्त करणे आवश्यक असून, ‘नीट’मधून देशभरातील एमबीबीएस, बीडीएस प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिष्यवृत्ती दिली जाते.

ऑक्टोबरच्या सुमारे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नोटीफिकेशन जाहीर होईल, त्या नंतर अर्जदारांना शिष्यवृत्तीसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठीचा कालावधी फक्त दोन आठवड्यांचा असेल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांत डिसेंबर महिन्यात शिष्यवृत्ती मिळेल. 

अत्यंत महत्त्वाचे
या परीक्षेचा फॉर्म भरावा का याबाबत सतत विचारणा होत आहे. याबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून निर्णय घ्यावा

आरोग्यविज्ञान शाखेतील प्रवेशासाठी देशभरात फक्त एकच ‘नीट २०२०’ परीक्षा होणार असून, सुमारे १६ लाख विद्यार्थी नोंदणी करतील. सर्वांनी स्कॉलरशिप परीक्षेचा फॉर्म भरू नये. 

एआयपीएमएसटीमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची निवड ही निव्वळ परीक्षेतील गुणांच्या आधारावरच आहे. जात, समुदाय, लिंग असे कोणतेही आरक्षण नाही. 
महाराष्ट्र राज्यामध्ये एससी, एसटी प्रवर्गासाठी सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते व त्यांच्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी संपूर्ण शुल्क माफी मिळते; परंतु उत्पन्न मर्यादा आठ लाख प्रतिवर्ष असे बंधन. ओबीसी एसईबीसी यांना ५० टक्के शुल्क माफी; परंतु उत्पन्न मर्यादा आठ लाख आहेच. अशी सवलत म्हणजेच शिष्यवृत्ती सद्यःस्थितीत आहेच. 

थोडक्यात, एससीएसटी वगळता ज्यांचे उत्पन्न आठ लाखांहून अधिक आहे, असे विद्यार्थी कोणत्याही प्रवर्गातील असले, तरीही त्यांना कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नाही, परंतु ते अत्यंत बुद्धिमान आहेत त्यांनी ही स्कॉलरशिप परीक्षा देण्यास हरकत नाही. एकंदरीत उत्पन्न आठ लाखांहून अधिक; परंतु ‘नीट २०२०’ तसेच एआयपीएमएसटी या दोन्ही परीक्षांत प्रचंड यश मिळविण्याची ज्यांना खात्री आहे, अशाच विद्यार्थ्यांनी फॉर्म अवश्य भरावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIPMST secondary 2020 scholarship process