वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्यायsakal

वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय

बारावीनंतर वाणिज्य शाखेमधील करिअरची चर्चा MBA, CA, CMA, CS, CFP, CFA या पर्यायांवर येऊन थांबते. मात्र, सध्या ACCA अभ्यासक्रमाची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. CA/CS/CMAची परीक्षा वर्षातून दोनदा तर ACCA ची परीक्षा वर्षातून चार वेळा घेतली जाते. याबाबतची माहिती करून घेऊया.

-दखल

श्रीया राजपुरोहित

बारावीनंतर वाणिज्य शाखेमधील करिअरची चर्चा MBA, CA, CMA, CS, CFP, CFA या पर्यायांवर येऊन थांबते. मात्र, सध्या ACCA अभ्यासक्रमाची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. CA/CS/CMAची परीक्षा वर्षातून दोनदा तर ACCA ची परीक्षा वर्षातून चार वेळा घेतली जाते. याबाबतची माहिती करून घेऊया.

ACCA : ACCA चे पूर्ण नाव असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड आहे. १९०४ मध्ये स्थापन झालेल्या या व्यावसायिक शिक्षणसंस्थेचं मुख्य कार्यालय लंडन येथे आहे. जवळपास १८० देशांमध्ये मान्यताप्राप्त असलेला हा कोर्स साडेपाच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी करत आहेत. अकाउंट्स, फायनान्स, ऑडिट क्षेत्रात काम करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये सीएचे अकाउंटिंग, फायनान्शिअल रिपोर्टिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शिअल मॅनेजमेंट या घटकांचा समावेश होतो.

अभ्यासक्रम : ACCA अभ्यासक्रम अप्लाइड नॉलेज, अप्लाइड स्किल्स आणि स्ट्रॅटेजी प्रोफेशनल स्किल्स लेव्हलमध्ये १३ विषयांत विभागला आहे. प्रोफेशनल लेव्हलमध्ये दोन अनिवार्य विषय आणि बाकी चारमधून दोन विषय निवडावे लागतात. ACCA एथिक्स आणि प्रोफेशनल स्किल मोड्युलदेखील पूर्ण करावे लागते. ‘सर्टिफाइड चार्टर्ड अकाउंटंट्स’ प्रमाणपत्रासाठी तीन वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे.

प्रवेश : किमान बारावी उत्तीर्ण, तसेच इंग्रजी आणि गणित/अकाउंटिंग विषयांमध्ये ६५ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे अनिवार्य आहे. वाणिज्यव्यतिरिक्तच्या इतर शाखांमधील विद्यार्थांना फाऊंडेशन डिप्लोमा पूर्ण करून प्रवेश घेता येतो. परीक्षा पात्रता : CA/CMA/CS/CFA पदवीधारकांना ९ विषयांमध्ये आणि वाणिज्य पदवीधारकांनादेखील चार/पाच विषयांमध्ये सूट मिळू शकते. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ५० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे अपेक्षित असते. एकदा एक विषयात उत्तीर्ण झाल्यावर त्या विषयाची परीक्षा पुन्हा द्यावी लागत नाही.

कालावधी : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सरासरी तीन-चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. कामाचा पूर्वानुभव असेल/परीक्षेत सूट असेल, तर दीड-दोन वर्षे लागू शकतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने, तसेच ऑन डिमांड वर्षातून चार वेळा घेतली जाते. कामाचा अनुभव : फायनान्स/ अकाउंटिंग/ऑडिट क्षेत्रातील ३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे. हा अनुभव कोर्स पूर्ण करण्यापूर्वी, करत असताना किंवा पूर्ण झाल्यावरदेखील घेऊ शकता.

खर्च : एखाद्या विद्यापीठामार्फत कोर्सला प्रवेश घेतला असेल/विषयांमध्ये सूट मिळत असेल, तर कोर्स पूर्ण करण्यासाठी दोन-तीन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असतो, ज्यामध्ये कोचिंग फी समाविष्ट नाही. यामध्ये नोंदणी फी, परीक्षा फी, वार्षिक वर्गणी यांचा समावेश आहे. स्वतःहून कोर्स करताना तीन-चार लाखांचा खर्च अपेक्षित असतो. एकदा केलेली नोंदणी पुढील १० वर्षे वैध असते.

उत्तीर्ण होण्याचे प्रमाण : भारतात स्किल लेव्हलमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४0 टक्के, तर प्रोफेशनल लेव्हलमध्ये ३० टक्के आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर सरासरी चार-पाच लाखांपासून पॅकेज मिळू शकते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना १० लाखांहून अधिकचे पॅकेजही मिळाले आहेत. ACCA वेबसाइटवर करिअर विभागात रिक्त पदे नमूद केलेली असतात किंवा स्वतःहून रिक्तपदांसाठी अर्ज करू शकतो.

करिअरच्या संधी : कोर्स पूर्ण केल्यानंतर अर्न्स्ट अँड यंग, केपीएमजी, ग्रँटथॉर्नटन अशा मान्यताप्राप्त कंपन्यांमध्ये ‘एन्ट्री लेव्हल’च्या नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होऊ शकतात. ACCA व्यावसायिक मॅनेजमेंट कन्सलटन्ट, ऑडिटर्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स, फायनान्शिअल कंट्रोलर, टॅक्स कन्सलटन्ट, फायनान्शिअल प्लॅनर पदांवर काम करू शकतात.

ACCA व्यावसायिक जगभर काम करू शकतो. CA/CS/CMA च्या पेपरमध्ये ६० अथवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले, तर त्या पेपरमध्ये सूट मिळते. ग्रूप क्लिअर नाही झाला, तरी तो विषय परत द्यावा लागत नाही. एखादा विद्यार्थी ग्रूपमधल्या सर्व विषयांमध्ये पास झाला, पण सरासरी ५० टक्के गुण नाही भरले, तर तो ग्रूप विद्यार्थांना परत द्यावा लागतो. विद्यार्थी तीनही लेव्हलचे एकेक पेपरदेखील देऊ शकतात आणि एक पेपर उत्तीर्ण झाल्यावर तो परत द्यावा लागत नाही.

(लेखिका ‘एमआयटी’च्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्समध्ये प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com