

job vacancy
esakal
Beed Latest News: बेरोजगारी आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर या विषयांची नेहमीच चर्चा जिल्ह्यात होत असते. मात्र, जिल्ह्यातील तरुणांसाठी येणारा 'राष्ट्रीय युवा दिन’ रोजगाराची मोठी संधी घेऊन येत आहे. अंबाजोगाई येथे होणाऱ्या विशेष रोजगार मेळाव्यात १६ नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, तब्बल ७८१ पदांच्या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखती पार पडणार आहेत.