Ambition
sakal
- विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी व यश टिकविण्यासाठी बऱ्याच गोष्टींवर खूप काम करावे लागते. उदाहरणार्थ त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास, त्यातील बारकावे, त्यातील अर्थकारण, त्या क्षेत्रातील मोठ्या लोकांची संगत, वरिष्ठांचा चांगला सल्ला, संयम, कायम नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी, व्यवसायासाठी ग्राहक केंद्रित सुधारणा व ग्राहकांचा विश्वास आदी.