स्मरणशक्ती तंत्रज्ञान

Memory Technology
Memory Technology

असे कधी घडते, की आपण काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ते लक्षातच राहू शकत नाही? अनेक विद्यार्थ्यांना अशा समस्या आहेत. मुलास ती माहिती व्हिज्युअल स्वरूपात सादर केली असल्यास ती लक्षात ठेवणे सोपे होईल. लक्षात ठेवा, आपला ‘ब्रेन’ हा एक स्नायू आहे आणि आपण आपल्या स्नायूंचा जितका अधिक व्यायाम करतो तितके ते मजबूत बनतात. चला तर, ‘ब्रेन’साठी काही व्यायाम करूया.

मेमोनिक्स वापरणे यांपैकी एक व्यायाम
‘मेमोनिक डिव्‍हायसेस’ ही साधने आणि तंत्रे आहेत, जी आपली ‘ब्रेन पॉवर’ वाढविण्यास मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. 
 हे माहिती पटकन लक्षात ठेवणे, टिकवून ठेवणे किंवा रिकॉल करण्याची क्षमता सुधारण्यास मदत करते. 
 हे मेमरी तंत्र आपल्या मेंदूला महत्त्वाची 
माहिती एका अनन्य मार्गाने एनकोड करण्याची अनुमती देते जे आपल्याला ती शिकण्यात मदत करते.
 हा सोपा शॉर्टकट वापरून आपण व्हिज्युअल चित्र, एक अद्वितीय वाक्य किंवा एका 
शब्दासह लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या माहितीदरम्यान एक संबंध तयार करतो.

अ. फनी स्टेटमेंट पद्धत
अनेक मुलांना आपली सौरमाला म्हणजेच सोलर सिस्टिममधील ग्रहांचा क्रम लक्षात ठेवण्यास अडचण येते.
अचूक क्रम आहे ः
 MERCURY 
 VENUS 
 EARTH 
 MARS 
 JUPITER 
 SATURN 
 URANUS 
 NEPTUNE 
 PLUTO
हे नऊ ग्रह लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट ः
खाली दिलेल्या वाक्यात शब्दांचे स्मरण करा. वाक्यात प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर लक्षात ठेवा.
My Very Educated Mother Just Served Us Noodles and Pancakes
 M – Mercury, V – Venus, E – Earth,
 M – Mars, J – Jupiter, 
S – Saturn,
 U – Uranus, N – Neptune, P – Pluto

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
  
ब. प्रतिमा पद्धत   
विशिष्ट चित्राचे दृश्यमान करून, आपण त्या प्रतिमेशी पूर्वी संबंधित असलेली माहिती सहजपणे आठवू शकता. बऱ्याचदा प्रतिमा जितकी हास्यास्पद असेल, तितकी आपल्याला लक्षात ठेवणे सोपे होईल. हातांच्या ‘‘KNUCKLES’’च्या साध्या प्रतिमेसह महिने कसे लक्षात ठेवावेत.

क. कविता पद्धत
चला, महिन्यातले किती दिवस आहेत, हे लक्षात ठेवण्यासाठी एक साधी कविता शिकू या:
    30 days in SEPTEMBER, APRIL, JUNE and NOVEMBER.
    All the rest have 31… fine! 
    February has 28 except for when it has 29.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ड. निरिक्षण पद्धत  
 जगातील सात खंड कसे लक्षात ठेवाल?
    ASIA, AFRICA, AMERICA (NORTH AMERICA and SOUTH AMERICA), AUSTRALIA, ANTARCTICA, EUROPE.
प्रत्येक खंडाच्या नावाकडे बारकाईने पाहा.
निरीक्षण : त्यांच्याकडे समान प्रारंभ आणि 
टोकाची अक्षरे आहेत.
तसेच, शब्दांच्या अक्षरांची संख्याही तपासा.

 ASIA – 4 LETTERS,
 AFRICA – 6 LETTERS
 EUROPE – 6 LETTERS
 AMERICA – 7 LETTERS
 AUSTRALIA – 9 LETTERS
 ANTARCTICA – 10 LETTERS

इ. एक शब्द पद्धत  
इंद्रधनुष्याचे रंग कसे लक्षात ठेवावेत.
VIOLET, INDIGO, BLUE, GREEN, YELLOW, ORANGE, RED
प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घ्या आणि जादू पाहा : आपल्याला एक नवीन शब्द मिळेल 
One Word : VIBGYOR
आता, आपल्याला फक्त VIBGYOR आठवते आणि इंद्रधनुष्याचे ७ रंग आपण कधीही विसरणार नाही. आपल्याला लक्षात येईल, की MNEMONIC TECHNIQUE वापरून शिकणे खूप मजेदार आहे... 
ALL THE BEST !!!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com