एपीजी लर्निंगतर्फे एमपीएससी CSAT साठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 6 August 2020

राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा पेपर दोन म्हणजे CSAT. जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा विषय असल्याने मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी हा पेपर वेळेत सोडविण्याला उमेदवारांचे प्राधान्य राहते. उमेदवारांची नैसर्गिक क्षमता व कौशल्य चाचणी तपासण्यासाठी या पेपरचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

पुणे: राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा पेपर दोन म्हणजे CSAT. जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा विषय असल्याने मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी हा पेपर वेळेत सोडविण्याला उमेदवारांचे प्राधान्य राहते. उमेदवारांची नैसर्गिक क्षमता व कौशल्य चाचणी तपासण्यासाठी या पेपरचा अंतर्भाव करण्यात आला आहे. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताच्या आधारे दिलेले प्रश्न उमेदवार किती लवकर सोडवितात आणि दिलेल्या एखाद्या परिस्थितीच्या आधारे स्वतःची निर्णय क्षमता व निर्णय प्रक्रिया कोणत्या दृष्टिकोनातून राबवतात यातून उमेदवार खरेच प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी पात्र आहेत की नाही हे तपासले जाते.

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लवकरच होणार आहे परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग बंद आहेत. या पार्श्वभूमीवर एपीजी लर्निंगतर्फे सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत अंकगणित व अनुमानात्मक (तार्किक) चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता आदी CSAT मधील घटकांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.CSATचा अभ्यास करणे म्हणजे जास्तीत जास्त सराव करणे होय. याच्या अभ्यासासाठी कोणतेही संदर्भसाहित्य उपयोगी पडत नाही. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त सराव हाच यामध्ये यश मिळवण्याचा मार्ग आहे.

यामध्ये परीक्षेत यशस्वी होण्यासाठीच्या ट्रिक्स व शॉर्टकट टेक्निक्स, असाइनमेंट, कमीत कमी वेळेत प्रश्न कसा सोडवावा व प्रश्नोत्तरांची सत्रे यांचा समावेश असणारे तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. नफा-तोटा, काळ-अंतर-वेग, ट्रेन व बोट यांचे विचारले जाणारे प्रश्न या घटकांची विशेष तयारी करून घेण्यात येईल. लाईव्ह ट्रेनिंग सेशन्स १३ ऑगस्टपासून ‘गुगल मीट’ ॲपवरती होणार आहेत. सोमवार ते शनिवार प्रत्येकी दोन तास असे पाच आठवड्यांचे प्रशिक्षण असणार आहे. मॉक टेस्स्ट्स व ऑनलाईन टेस्ट सिरीजने प्रशिक्षणाचा शेवट होईल. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये.अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: APG learning arranges CSAT course for MPSC students