कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ साठी ३१ मार्चपर्यंत करा अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली
कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ साठी ३१ मार्चपर्यंत करा अर्ज
कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ साठी ३१ मार्चपर्यंत करा अर्ज

पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) ११ ते १३ जून या कालावधीत राज्यातील १७ केंद्रांवर होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. सीईटीतील गुणांवरूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्यापीठ परीक्षा मंडळाने सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविली असून आता विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २ एप्रिलपर्यंत वाढवली असल्याची माहिती परीक्षा मंडळाच्या नियंत्रकांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com