बारावीनंतर पुढे काय? मेडिकल आणि इंजिनिअरिंगपेक्षाही निवडा वेगळे करिअर

This are different way to choose after 12 th than medical and engineering
This are different way to choose after 12 th than medical and engineering

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार याबरोबरच  अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेच काहूर माजायला सुरुवात होते कारण प्रत्येकाच्या करिअरमध्ये दहावी-बारावी या वर्षांना एक वेगळं महत्त्व दिले जाते. त्यात जर कोणी बारावी सायन्सला असेल तर तो नक्की डॉक्टर होणार की इंजिनियर? असाच थेट प्रश्न अनेक जण विचारत असतात. पण डॉक्टर व इंजिनीअरिंगच्या पलीकडे देखील बारावी सायन्स नंतर करिअर संधी आहेत, हे आपली मंडळी विसरूनच जातात. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने सायन्ससाठी अनेक मोठ्या संस्था उभारलेल्या आहेत. त्यामध्ये IISER'S, NISER'S या संस्थांचा देखील समावेश होतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गव्हर्नमेंट संस्थांची यादी खालील प्रमाणे आहे, ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर सायन्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
1. Indian Institute of Technology (IIT).
2. Indian Institute of Science (IISc), Bangalore.
3. Indian Statistical Institute (ISI).
4. Indian Institute of Science Education and Research (IISER).
5. Chennai Mathematical Institute (CMI).
6. National Institute of Science Education and Research (NISER), Bhubaneswar.

EDU नोकरी करिअर विषयी लेख वाचण्यासाठी येथे   ► क्लिक करा 

वरती दिलेल्या यादीमध्ये IIT, IISER आणि ISI च्या वेगवेगळ्या शाखा आपल्या देशामध्ये आहेत. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात व संपूर्ण देशभरातून विद्यार्थी या परीक्षांना बसतात.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'सुपर थर्टी' हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आयआयटीच्या परीक्षेसाठी असणारी स्पर्धा लक्षात येईल. परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता रेग्युलर पुस्तकांव्यतिरिक्त उच्च दर्जाचे रेफरन्स मटेरियल या परीक्षेच्या तयारीसाठी वापरणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्टचा सखोल अभ्यास व वेळेचे नियोजन हे या परीक्षांसाठी अनिवार्य आहे. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण करून जर तुम्ही या परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली तर निश्चितच तुम्हाला या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते.

वरील संस्था प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फेलोशिप देखील देतात. तसेच घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था फी भरण्यासाठी आर्थिक मदत देखील करतात. त्याचबरोबर, जर तुम्ही वरील संस्थांमध्ये बारावी नंतर प्रवेश घेण्यास अपयशी ठरला तरीदेखील तुम्हाला पुढे पदव्युत्तर किंवा पीएचडीच्या शिक्षणासाठी या संस्थांमध्ये प्रवेश मिळविता येऊ शकतो. त्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहे. 

वरती नमूद केलेल्या संस्थांव्यतिरिक्त आपल्या देशात काही जागतिक नामांकन मिळालेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटस देखील आहेत, ज्यामध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधनासाठी प्रवेश घेऊ शकता. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा उल्लेख महत्वाचा वाटतो. 
1. TATA Institute of Fundamental Research (TIFR).
2. Harish Chandra Research Institute (HRI), Allahabad.
3. The National Centre for Biological Sciences (NCBS), Bangalore.
4. The Institute of Mathematical Sciences (IMSC), Chennai.
5. International Center for Theoretical Sciences (ICTS), Bangalore.
6. CSIR-National Chemical Laboratory (NCL), Pune.

या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या नोकऱ्या व परदेशात शिकण्यासाठी संधी देखील मिळू शकते. या संस्थांविषयी आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही  संस्थेच्या संकेत स्थळावर जाऊन अपेक्षित माहिती मिळवू शकता.


 

(लेखिका प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com