
चीनच्या कम्युनिस्ट पक्षात नेत्यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांना अडगळीत टाकले जाते. तसेच आता अध्यक्ष शी जिंग पिन यांच्याबाबतीत होत आहे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
जेवढी गुप्तता अधिक, तेवढे तर्कवितर्क जास्त. हे समीकरण मानवी स्वभावाला धरूनच आहे. चीनच्या बाबतीत ते जास्तच खरे आहे, याचे कारण तिथल्या पोलादी पडद्यामागील घडामोडींचे परिणाम तर जगाला भोगावे लागतात; पण तिथे काय चालले आहे, हे नेमके समजत नाही.