Birsa Munda Schemeने बदलले अर्पितचे आयुष्य! ST तरुणांना ५० लाखांपर्यंतचे कर्ज; ७ वर्षे मिळणार ५% व्याज अनुदान, जाणून घ्या पात्रता

Madhya Pradesh’s Bhagwan Birsa Munda self-employment scheme: भगवान बिरसा मुंडा स्वरोजगार योजने'साठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे अन् व्यवसायांची यादी
birsa munda scheme benefits for st youth

birsa munda scheme benefits for st youth

esakal

Updated on

नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग झाबुआ येथील शिक्षित तरुण अर्पित पारसिंह मचार यांनी निवडला. मध्य प्रदेश सरकारच्या भगवान बिरसा मुंडा स्वरोजगार योजनेचा लाभ घेत अर्पित यांनी अमुल पार्लर सुरू केला. आज या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असून, त्यांनी अन्य एका तरुणालाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

अर्पित यांनी या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यातून अमुल पार्लरचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला स्वतःच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या या व्यवसायाने आता चांगला आकार घेतला आहे. नियमित उत्पन्न मिळू लागल्याने अर्पित आत्मनिर्भर झाले असून, व्यवसायाच्या माध्यमातून दुसऱ्या तरुणासाठीही रोजगार निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com