नवं काही : ग्लोबल इनोव्हेशन हब होण्यासाठी...

Innovation-Hub
Innovation-Hub

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (आयआयएम) ‘टाटा सोशल एंटरप्राइज चॅलेंज २०२०’ पुरस्कारासाठी मी नुकतेच परीक्षक म्हणून काम केले. आमच्या पॅनेलला १० स्टार्ट अप्सचे परीक्षण करायचे होते. मला सामाजिक संबंध आणि इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातून तीन-चार संकल्पना आवडल्या. मी संयोजकांना अधिक चांगले उमेदवार निवडण्याचा सल्लाही दिला. त्यांना मला निवडीची प्रक्रिया विशद करत त्यात सुधारणा करण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘‘या पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून, प्रत्येक वर्षी अधिक चांगले उमेदवार निवडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षीही आम्ही १००० प्रवेशिकांमधून ६० प्रवेशिका शॉर्टलिस्ट केल्या. त्यानंतर एक समिती नेमून त्यातीलही २० प्रवेशिकांची निवड केली. त्यानंतरही परीक्षकांच्या आणखी एका समितीने १० संकल्पना अंतिम केल्या.’’ मी संयोजकांच्या प्रयत्नांचे निश्चितच कौतुक करतो. माझ्या ‘आयडिया कॉम्पिटिशन’ या स्पर्धेतही १,६०० संकल्पनांपैकी केवळ १८ ते २० निधी पुरवण्यायोग्य होत्या.

इनोव्हेटिव्ह पॅडकेअर लॅब्ज
‘टाटा सोशल एंटरप्राईज चॅलेंज २०२०’मध्ये मला पुण्यातील एका स्टार्टअपची संकल्पना खूपच आवडली. ‘पॅडकेअर लॅब्स’ सॅनिटरी नॅपकिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर काम करत आहे. एका अंदाजानुसार, भारतात वर्षाला १२ अब्ज सॅनिटरी नॅपकिनचा वापर होतो. त्यांपैकी ९८ टक्के पाण्यात टाकले जातात किंवा कचराडेपोमध्ये नेऊन टाकले जातात. एका सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लागण्यासाठी ८०० वर्षे लागतात. त्यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर धूर होतो. त्यामुळे, पॅडकेअर लॅब्सने त्यांच्या विल्हेवाटीची सुरक्षित, पर्यावरणपूरक पद्धत शोधली आहे. 

नेमकी कशी प्रक्रिया होते? 
या लॅबने नावीन्यपूर्ण केमो-मेकॅनिकल तंत्रज्ञान शोधले आहे. युजरला सॅनिटरी पॅड मशीनमध्ये घालावे लागते. त्यानंतर, ते ताबडतोब विघटित होते. सेंद्रिय रसायनाद्वारे त्याला दुर्गंधीरहित, कीटाणूरहित केले जाते. या रासायनिक प्रक्रियेमुळे नॅपकिनमधील शोषक पॉलिमर निष्क्रिय होतो. विघटित झालेला टाकाऊ पदार्थ सेल्युलोज आणि प्लॅस्टिकमध्ये विभक्त होतो. पॅडकेअर टीम याचा वापर कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी करते. पॅडकेअर लॅबसारखे साधे इनोव्हेशन आधुनिक जगातील मोठ्या समस्यांना उत्तर शोधण्यास कसे सक्षम आहेत, याचेच हे उदाहरण. आपल्याला अशा अनेक संकल्पना हव्यात. त्यामुळे भारत इनोव्हेशनचे ‘ग्लोबल हब’ ठरेल.

(लेखक मानव संसाधन विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com