आनंदी संभाषणासाठी... 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 16 April 2020

माझ्यापुरते बोलायचे तर माझ्यासाठी संभाषण किंवा अर्थपूर्ण संभाषणाचा अर्थ असा आहे. माझ्याभोवती इतर कुणीही नसते, तेव्हा मी स्वत:बरोबरच किंवा माझ्या भोवतालच्या वस्तूंशी संवाद साधतो. 

मला अनेकजण नेहमी विचारतात, ‘एखादी व्यक्ती नेहमीच उत्साही, आनंदी कशी राहू शकते?’ माझ्यापुरते बोलायचे तर माझ्यासाठी संभाषण किंवा अर्थपूर्ण संभाषणाचा अर्थ असा आहे. माझ्याभोवती इतर कुणीही नसते, तेव्हा मी स्वत:बरोबरच किंवा माझ्या भोवतालच्या वस्तूंशी संवाद साधतो. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका रविवारच्या सकाळची गोष्ट. नुकतेच मी एका वृक्षाबरोबरचे संभाषण संपविले होते. आमच्यात अशा प्रकारे संभाषण झाले. वृक्षाने मला विचारले, ‘तू सकाळी सकाळी मला अशा प्रकारे घट्ट मिठीत का घेतले?’ मी म्हणालो, ‘तुझ्याबरोबरच्या या मिठीने मला ताकदवान, सशक्त बनविले. मला मजबूत झाल्यासारखे वाटतेय. मला पण तुझ्याबरोबर घट्टपणे रुजल्याप्रमाणे वाटतेय.’ 

‘ओह, खरेच असे आहे का,’ त्या वृक्षाने प्रश्‍न केला. 

मी म्हणालो, ‘होय. तुला मिठी मारल्यामुळे माझ्यामधील उपयुक्त नसलेले सर्वकाही बाहेर पडले. तू ज्याप्रमाणे आपली कोरडी पाने गाळतोस, त्याप्रमाणे माझ्या मनातील नकोसे विचारही गळून पडले. तुझ्या आकाशाच्या दिशेने झेपावणाऱ्या फांद्या मला परमेश्‍वराच्या आशीर्वाद देणाऱ्या हाताप्रमाणे वाटल्या. त्यांनी मला संपूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी आशीर्वाद दिला. त्याचप्रमाणे, मी काही पक्ष्यांची किलबिलही तुझ्या फांद्यांवर ऐकली.’ 

मी आजूबाजूच्या वस्तूंशी अशा प्रकारे संभाषण साधतो. याच गोष्टीने मला पुढे चालत राहण्याची शक्ती दिली. यापुढेही ती मला पुढे चालवत राहील. तुम्हीही अशा प्रकारे संभाषण साधता का? सध्या कोरोना संकटामुळे आपण आपापल्या घरीच आहोत. अशा प्रकारे आनंदी, अर्थपूर्ण संभाषण साधण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. ते खरोखरच आपल्याला ऊर्जादायी, आनंदी बनवते. अशा प्रकारचे संभाषण सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण करते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about for a happy conversation

Tags
टॉपिकस
Topic Tags: