व्यक्तिमत्त्वाला हवी गुणांची झळाळी

व्यक्तिमत्त्वाला हवी गुणांची झळाळी

महत्त्व सॉफ्ट स्किल्सचे..... 
सध्याच्या युगात आपल्यामध्ये काही कौशल्य असणे आवश्‍यक आहे. बहुतांश मुले पुस्तकी किडे असतात. त्यांना पुस्तकाबाहेरचे विचारले तर योग्य पद्धतीने उत्तरे देता येत नाही. सध्याच्या जगात निव्वळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही. व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स महत्त्वाचे आहेत. सॉफ्ट स्किल्स आपल्या सर्वांमध्ये अंगभूत असतात त्यामुळे आपण इतरांशी परिणामकारकपणे संवाद साधू शकतो. थोडक्यात काही सॉफ्ट स्किल्स बद्दल जाणून घेऊ : 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संवाद कौशल्य (Effective Communication) - वक्तृत्व हा व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. नोकरी असो अथवा व्यवसाय सगळीकडे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसले पाहिजे. वक्तृत्व प्रभावी करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करावा. वक्तृत्व केवळ प्राध्यापक किंवा लोकप्रतिनिधींसाठीच नव्हे, तर प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. संवाद कौशल्यावर आपले प्रभुत्व असावे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन बोलताना एवढे प्रभावी हवे की, आपण समोरच्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. 

ध्येय निश्‍चिती (Goal Setting) - आयुष्यात योग्य ध्येय ठेवावे आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रयत्नात सातत्य ठेवल्यास तुम्ही यशस्वी होणारच. भरपूर कष्ट करा, मोठी स्वप्न पाहा आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. कधीही स्वतःला कमी लेखू नका, प्रत्येकाने आपले गुण ओळखले पाहिजे. 

वेळेचे नियोजन (Time Management) - गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही. दिवसात २४ तास आहे, त्याचा पुरेपूर वापर करा. वेळेचे व्यवस्थित नियोजन करायला शिका. कोणतेही काम हे ठरलेल्या वेळेत करणे महत्त्वाचे आहे. वक्तशीरपणामुळेच यशाचा आलेख वाढवू शकता. म्हणून वेळेची किंमत करायलाच हवी. 

तणाव व्यवस्थापन (Stress Management) - आयुष्यात अनेक प्रकारचे ताणतणाव निर्माण होतात. त्यांना टाळण्यापेक्षा सामोरे जायला शिका. तणाव कशामुळे येत आहे, हे जाणून घ्या. योगा, प्राणायाम यांच्या साहाय्याने मन शांत करण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित जेवा आणि भरपूर पाणी प्या. ताण देणाऱ्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करणे टाळा. 

समस्या सोडवणे (Problem Solving) - जीवनातील समस्यांचा सखोल अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न करा. आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. एखादी समस्या आल्यास डगमगून न जाता ती जाणीवपूर्वक विचार करून सोडवा. संकट आल्यावर तुम्ही काय करता आणि त्याला कशी प्रतिक्रिया देता हे महत्त्वाचे असते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नेतृत्व गुण (Leadership Quality) - धाडसी आणि कुठल्याही पेच प्रसंगात स्वतः पुढाकार घेण्याची तयारी असते त्याला नेतृत्व गुण मानले जाते. निर्णय घेण्याची अचूक क्षमता असणे नेतृत्व गुणाचाच भाग आहे. 

माणसं जोडा (Team Building) - माणसं जोडणे ही एक कला आहे. जेवढे बोलणे गरजेचे आहे तेवढेच ऐकणे गरजेचे आहे. समोरच्याचा आदर करा आणि तो काय बोलतो आहे ते लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांशी गोडीने बोला आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. माणसे जोडण्याच्या कलेमुळेच अडीअडचणीच्या वेळी कोणीही तुम्हाला मदत करायला तत्पर तयार होते. 

वेशभूषा (Grooming) - आपली वेशभूषा प्रसंगानुरूप हवी. वेषभूषेने समोरच्यावर तुमची छाप पडते. वेषभूषेबरोबर तुमची देहबोली महत्त्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीवर, समूहावर तुमचा प्रभाव पाडण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com