esakal | मनातलं : स्मरणशक्तीचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

A game of memory

लहान मुलांच्या शालेय प्रवासासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्‍यक आहेत, जसे की...
१) स्मरणशक्ती MEMORY POWER
२) एकाग्रता (CONCENTRATION) 
३) तर्कशास्त्र LOGICAL THINKING
४) मोटर कौशल्य MOTOR SKILLS

मनातलं : स्मरणशक्तीचा खेळ

sakal_logo
By
आनंद महाजन व मोनिता महाजन

लहान मुलांच्या शालेय प्रवासासाठी काही गोष्टी अत्यंत आवश्‍यक आहेत, जसे की...
१) स्मरणशक्ती MEMORY POWER
२) एकाग्रता (CONCENTRATION) 
३) तर्कशास्त्र LOGICAL THINKING
४) मोटर कौशल्य MOTOR SKILLS

रोज फक्त दहा मिनिटे पालकांनी मुलांना देऊन त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ करता येते. चला, पालकांनी आणि मुलांनी मिळून एकत्र स्मरणशक्तीचा खेळ खेळूया

1) पाढे पाठ करणे -
शाळेत पाढे पाठ करणे कुणालाही चुकले नाही. आपण पाढे पाठ करायची नवीन पद्धत पाहूया. या पद्धतीमध्ये ‘रँडम मेमरी’चा वापर केला जातो आणि पाढे लवकर पाठ करता येतात.

STEP : 1
बे एके बे, बे दुणे चार असं करण्याऐवजी 3 X 7 चे उत्तर काय आहे, हे विचारावे. मुलाला उत्तर माहीत नसल्यास आपण त्याला उत्तर 21 आहे, असे सांगावे म्हणजेच 3 X 7 = 21 हे त्याला सांगून तीन वेळा परत बोलण्यास सांगावे. 
नंतर 3 X 7 = ? आणि 7 X 3 = ? असे 3 वेळा विचारावे. 

STEP : 2
8 X 7 म्हणजे किती हे विचारावे. उत्तर लगेच येत नसल्यास मुलाला सांगावे, की 8 X 7 = 56. 
तीनदा पाठांतर केल्यानंतर 7 X 8 उत्तर विचारावे. 
गंमत बघा ः मुलं लगेच 7 X 8 = 56 असे उत्तर पटकन देतील. 

STEP : 3
3 X 7 = ? 8 X 7 = ? 
7 X 8 = ? 7 X 3 = ? असे आलटून पालटून तीनदा विचारावे. 
त्यात नवीन आकड्याची भर घालावी. 9 X 6 = ? 
हे विचारावे आणि वरील स्टेप रिपीट कराव्यात. 
मुद्दाम बसल्या बसल्या शिकवलेल्या कुठल्याही पाढ्याचा प्रश्‍न मोठ्यांनी एकमेकांना विचारावा. लहान मुलं शेजारी बसले असताना त्याचे कान रडार सारखा हा प्रश्‍न पटकन ऐकतात आणि उत्सुकतेने पाढ्याचे उत्तर सांगतात. आता मुले हसत-खेळत पाठांतरासाठी तयार होतील. 

2) मोबाईल नंबर स्मरणशक्ती स्पर्धा -
आपल्या जवळच्या १० लोकांच्या मोबाईल नंबरची यादी बनवावी. रोज १० मिनिटांसाठी एका व्यक्तीचे नाव आणि मोबाईल नंबर जोरात बोलून २० वेळा लिहावा. 
जोरात (मोठ्या आवाजात) बोलून लिहिल्यामुळे नाव आणि नंबर पाठ होतोच, पण त्याबरोबर मुलांची ‘स्पीच इंम्प्रुव्हमेंट’ही होते. 
दुसऱ्या दिवशी पाठ केलेला नंबर तीनदा म्हणावा आणि मग पुढचा नवीन नंबर व नाव १० मिनिटांसाठी २० वेळा लिहावे. अशाप्रकारे पाठांतर केल्यावर मुलांना खूप मज्जा येते.  सगळी मित्रमंडळी एकत्र बसलेली असताना मुलांच्या स्मरणशक्तीचे छोटे प्रात्यक्षिक द्यावे. मुलांच्या आत्मविश्‍वासात बदल जाणवतो. त्या उत्सुकतेमुळे मुले शाळेचा अभ्यास करायला कधीच कंटाळा नाही करणार. या दोन पद्धती आपण जरूर अमलात आणून मुलांचे छान व्हिडिओ काढा.