भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरजालातील सेवांचा वापर

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 9 July 2020

आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यातील घटक आणि विविध उपयोजन याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक कृत्रिम बुद्धिमत्ताधारित प्रणालींचा वापर करत असतो. अशा प्रणालींबद्दल आजच्या लेखामध्ये बोलूया. आपण या प्रणाली अनेकवेळा दिवसातून अनेक वेळा वापरतो, पण त्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित हे आपल्याला माहीत नसते. त्यांच्या अशा खास वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला कुतूहल असते आणि या खास गोष्टी या प्रणाली कशा काय पूर्ण करतात याबद्दल आश्चर्यही! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण जो भ्रमणध्वनी वापरतो, तो आज आपल्याला जगाकडे नेणारा महादरवाजा बनला आहे. अनेक भ्रमणध्वनी आजूबाजूच्या प्रकाशानुसार पटलावरील प्रकाशमानता कमी जास्त करत असतात आणि यामागे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला असतो. अनेक भ्रमणध्वनी आपण नेहमी वापरात असलेल्या प्रणाली (ॲप्स) आपल्याला सहजरित्या दिसतील, अशा ठिकाणी मांडून ठेवली. जातात. पुढे जाऊन हा क्रम दिवसानुसार आणि वेळेनुसार बदलतो. उदा. आपण सकाळी गुगल न्यूज पाहत असाल, तर ते ॲप आपल्याला सकाळी अग्रक्रमावर दिसते. दुपारी शेअर बाजारासंदर्भातील प्रणाली वापरात असाल, तर त्या आपल्यासमोर दुपारी अग्रक्रमाने मांडल्या जातात.   

आपण आंतरजालातील अनेक सेवांचा वापर करत असतो. ई-संदेश (ई-मेल) सेवा वापरताना आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक आविष्कार अनुभवत असतो. उदा. आपल्याला नकोसे असणारे ई-संदेश स्पॅम असे चिन्हांकित केले जातात. अनेक महत्त्वाचे संदेश ‘महत्त्वाचे’ असे चिन्हांकित केले जातात. असे वर्गीकरण आपल्या ई-संदेशनबरोबर केलेल्या व्यवहारातून ई-संदेश सेवा प्रणाली शिकत असते आणि त्यानुसार ही चिन्हांकन दिली जातात. ‘जी-मेल’ सारखी अत्याधुनिक ई-संदेश प्रणाली आपल्याला काही अक्षरांवरून पूर्ण शब्द सुचवते वा काही शब्दांवरून पूर्ण वाक्य सुचवत असते. यामागे कृत्रिम बुद्धिमत्तेतील अतिशय प्रगत तंत्रांचा वापर केलेला आहे. हे शब्द किंवा वाक्ये आपल्या पूर्व  संदेशामधून आत्मसात केल्या जातात. आपण  एखाद्या व्यक्तीच्या सततच्या सहवासातून त्यांच्या विविध लकबी जशा बघतो किंवा ओळखायला शिकतो, अगदी तसेच काहीसे हे प्रकरण! 

पुढील लेखामध्ये आपण अजून अशाच प्रकारची उदाहरणे बघूया.
1) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या खास वैशिष्ट्यांबद्दल कुतूहल
2) मोबाइल, ॲप्स आदींमध्ये वापर
3) ई-मेलसह आंतरजालातील अनेक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr aashish tendulkar on future job