भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेची दैनंदिन जीवनातील उपयोगिता

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 11 June 2020

आपण आजच्या भागात कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगवेगळ्या क्षेत्रांतील उपयोगिता पाहणार आहोत. मी यासाठी आपल्या रोजच्या व्यवहारातील किंवा जिव्हाळ्याच्या क्षेत्रांबद्दल बोलणार आहे. आतापर्यंत या लेखमालेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, त्याचे प्रकार, त्यासंबंधीच्या प्रणाली कशा विकसित करतात आणि त्यांचा वापर कसा करतात याविषयी चर्चा केली.

आपण आजच्या भागात कृत्रिम बुद्धिमत्तेची वेगवेगळ्या क्षेत्रांतील उपयोगिता पाहणार आहोत. मी यासाठी आपल्या रोजच्या व्यवहारातील किंवा जिव्हाळ्याच्या क्षेत्रांबद्दल बोलणार आहे. आतापर्यंत या लेखमालेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, त्याचे प्रकार, त्यासंबंधीच्या प्रणाली कशा विकसित करतात आणि त्यांचा वापर कसा करतात याविषयी चर्चा केली. यापुढील काही भाग आपण आपल्या जिव्हाळ्याच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यासंबंधी चर्चा करूया.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळ्याच्या काळात आपल्याकडे शेतीची कामे सुरू होतात. आपल्या देशातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. शेतीक्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताधारित प्रणाली वापरता येतील का याचा विचार करूया. मी काही शेतीतज्ज्ञ नाही, पण माझ्या सामान्यज्ञानाच्या आधाराने काही प्रश्‍न मांडतो. पुढील प्रश्‍नांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येईल का याचा विचार करूया. यासाठी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ताधारित प्रारूपे विकसित करावी लागतील.

  • शेतीमध्ये कोणते एखाद्या पिकाचे नेमके कोणते वाण वापरावे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल?
  • शेतीतील पाण्याचे किंवा पिकांना देण्यात येणाऱ्या पोषण मूल्यांचे नियोजन जेणेकरून कमीत कमी साधनांच्या वापरातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल?
  • कोणकोणत्या अळ्यांचा किंवा रोगाचा धोका संभवतो?
  • उत्पादन केलेल्या शेतमालाला कोणत्या बाजारपेठेत किती भाव मिळेल?

असे अजूनही महत्त्वाचे प्रश्‍न आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू शकतो. आता या नवीन पद्धतीने प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे?

  • तालीम संच : आपण पाहिले आहे, ‘विना विदा नाही कृत्रिम प्रज्ञा.’ आपल्याला या प्रत्येक प्रश्‍नासाठी तालीम संच तयार करावे लागतील. यासाठी लागणारी माहिती विविध ठिकाणी विखुरलेली आहे. ती एकत्र करून कृत्रिम संच तयार करावे लागतील.
  • कृत्रिम बुद्धिमता प्रारूपे तयार करणे : प्रत्येक प्रश्‍नांसाठी आपल्याला एक किंवा अनेक प्रारूपे विकसित करावी लागतील. 
  • विकसित केलेली प्रारूपे किती सुयोग्य काम करतात याची परीक्षा करावी लागेल. 
  • ही प्रारूपे शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन किंवा लघुसंदेश देणाऱ्या प्रणाली विकसित कराव्या लागतील. पुढील लेखात या क्षेत्रामध्ये वापरात असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींविषयी बोलूया. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on future job