भविष्य नोकऱ्यांचे : संगणकदृष्टीचा अनुभव

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 1 October 2020

संगणकदृष्टी तंत्रज्ञान मुख्यत्वे छायाचित्रावरून विविध गोष्टींचे आकलन करण्यासाठी वापरले जाते. छायाचित्रांतून विविध वस्तू ओळखणे, माणसांचे चेहरे, त्यावरील भाव-भावना, वस्तूतील दोष, वस्तूंचे वर्गीकरण आणि इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. या सर्व बाबींमुळे संगणकदृष्टीचा वापर अनेक क्षेत्रामध्ये केला जातो. काही उपयोजनांमध्ये उपलब्ध माहिती चित्रस्वरूपात बदलून त्यावर संगणकदृष्टी तंत्राचा वापर केला गेला आहे.

आपण आजच्या लेखामध्ये संगणकदृष्टी अर्थातच कॉम्प्युटर व्हिजन तंत्रांच्या काही उपयोजनांची (ॲप्लिकेशन्स) चर्चा करूया. 

संगणकदृष्टी तंत्रज्ञान मुख्यत्वे छायाचित्रावरून विविध गोष्टींचे आकलन करण्यासाठी वापरले जाते. छायाचित्रांतून विविध वस्तू ओळखणे, माणसांचे चेहरे, त्यावरील भाव-भावना, वस्तूतील दोष, वस्तूंचे वर्गीकरण आणि इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. या सर्व बाबींमुळे संगणकदृष्टीचा वापर अनेक क्षेत्रामध्ये केला जातो. काही उपयोजनांमध्ये उपलब्ध माहिती चित्रस्वरूपात बदलून त्यावर संगणकदृष्टी तंत्राचा वापर केला गेला आहे. उदा. बँक व्यवहारातील अफरातफर शोधण्यासाठी अशा प्रकारच्या तंत्राचा वापर अतिशय प्रभावीपणे केला गेला आहे. खात्यातील व्यवहार दिवसाच्या तासांनुसार चित्रस्वरूपात मांडून संगणकदृष्टीच्या साहाय्याने अचूकपणे संशयित व्यवहारांचा शोध लावला गेला. दुसरीकडे दृष्टिहीन लोकांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठीही या तंत्राचा वापर केला जातो. मोबाईलला कॅमेऱ्यात कैद दृश्यावरून त्यातील विविध वस्तुविषयक माहिती, त्यापासूनच अंतर, छापील लेबल वाचणे इत्यादी कामे या तंत्राच्या साहाय्याने पार पाडली जात आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण सर्वजण आता या तंत्राचा अनुभव घेऊया. त्यासाठी आपण गुगल क्लाऊडवरील संगणकदृष्टीचा वापर करूया. आपण सर्वजण cloud.google.com/vision या संकेतस्थळावर जाऊन ‘Try the API’ मध्ये छायाचित्र टाकून संगणकदृष्टीचा अनुभव घेऊ शकाल. येथे संगणकदृष्टीची अनुभूती काही लेबलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवली जाते. मी काही चित्रे आणि त्यामधून संगणकदृष्टीला आलेली अनुभूती खालील तक्त्यात दिली आहे. मी वानगीदाखल ५ सर्वांत महत्त्वाची लेबल तक्त्यामध्ये दिली आहेत. प्रत्येक लेबल बरोबर संगणकाचा त्याबाबतीतील विश्वास टक्क्यांत दिला आहे.

चित्र-संगणकाच्यादृष्टीने लेबल
Body Of Water     98%
Natural Landscape     97%
Coast     95%
Shore     90%

Mountainous Landforms     99%
Mountain    99%
Mountain Range     99%
Ridge    95%
Sky    93%

School Uniform    97%
Nature    95%
Uniform    95%
People    93%

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr ashish tendulkar on future jobs

Tags
टॉपिकस
Topic Tags: