भविष्य नोकऱ्यांचे : ‘एआय’ आणि स्टार्टअप संस्कृती

Startup-Culture
Startup-Culture

आजच्या लेखात आपण ‘एआय स्टार्टअप’बद्दल जाणून घेऊया. मागील १० महिन्यांत या लेखमालेमधून आपल्याला ‘एआय’ची विविधांगाने ओळख झाली आहे. आपल्यापैकी काही जण याचा वापर आपल्या दैनंदिन किंवा व्यावसायिक जीवनातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करता येईल का आणि यातून काही स्टार्टअप सुरू करता येईल का, असा विचार करत असाल. त्यानुषंगाने आपण ‘एआय’चा विचार करूया.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या कोणत्याही प्रश्नांमध्ये त्याची सोडवणूक हा प्राथमिक भाग असतो आणि त्यासाठी आपण वेगवेगळी हत्यारे वापरत असतो. काही प्रश्न मनुष्यबळाचा वापर करून सुटणारे असतात, तर काही संगणकीय प्रणाली वापरून. काही प्रश्न ‘एआय’च्या मदतीने सोडविता येतात. उदा. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षा कशी घ्यायची, हा प्रश्न सोडविताना आपल्याला प्रश्नपत्रिका मांडणारी प्रणाली, तो सोडविताना विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आणि अंतिमतः प्रश्नपत्रिका शिक्षकांपर्यंत पोचवणारी प्रणाली तयार करावी लागेल. आता ही प्रणाली निर्माण करतानाच आपण येनकेन प्रकारे ‘एआय’चा वापर करणार, असे ठरवून चालणार नाही.

सुयोग्य ‘एआय’ तंत्रज्ञानाची, कुशल मनुष्यबळ आणि किमान तालीम संचाची उपलब्धता असल्यासच ‘एआय’चा वापर खूप लाभदायी ठरू शकतो, तर दुसरीकडे साकल्याने विचार न करता सुरुवातीलाच केलेला ‘एआय’चा वापर प्रॉडक्ट पूर्णत्वाला नेण्यामधील अडचण ठरू शकतो. अनेक वेळा तालीम संच उपलब्ध नसणे किंवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध असणे, तर काही वेळेला प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, सुयोग्य ‘एआय’ तंत्रज्ञानाची अनुपलब्धता आणि त्याच्या संशोधनासाठी लागणारा वेळ, अशी अनेक कारणे सुरुवातीलाच ‘एआय’च्या वापरावर मर्यादा आणतात. आणि अशा परिस्थितीतील ‘एआय’चा वापर प्रणाली पूर्ततेतील बाधा ठरू शकतो. 

थोडक्यात सांगायचे तर, व्यावसायिक संधी आणि तांत्रिक व्यवहार्यता, या दोन्ही कसोट्यांवर एआयचा वापर करावा की करू नये, हे अवलंबून असते. तालीम संच उपलब्ध नसल्यास सुरुवातीला मनुष्यबळाचा वापर करून योग्य प्रक्रियेतून तालीम संच तयार करून घेता येणे शक्य असते. आणि एकदा तालीम संच तयार झाल्यावर त्यायोगे ‘एआय’ प्रणालीला ठरावीक कामामध्ये प्रावीण्य प्राप्त करून घेता येते. आपल्याकडे तज्ज्ञ तंत्रज्ञांचा अभाव असल्यास तयार ‘एआय प्रणालीचा APIच्या साहाय्याने आपल्या कामासाठी उपयोग करून घेता येतो किंवा ‘ऑटो एआय’ प्रणालींचा त्या कामासाठी उपयोग करून घेता येतो. या प्रणालींना फक्त तालीम संच उपलब्ध करून द्यावे लागतात - आणि ते आपल्या इच्छित करण्यासाठीच्या ‘एआय’ प्रणाली प्रवीण करून देतात. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उकलीमध्ये ‘एआय’चा वापर दिसत असल्यास वर दिलेल्या क्लृप्त्या वापरून आपला कार्यभाग साधता येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com