विशेष : नवा अभ्यासक्रम एआय अणि डेटासायन्स

AI-technology
AI-technology

डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारख्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चौथी औद्योगिक क्रांती उलगडत आहे. विद्यार्थ्यांनी डिजिटल नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत ‘एआय’चा वापर विविध खासगी आस्थापनांमध्ये वाढलेला आहे. याची कारणे संगणकीय विज्ञानात झालेली प्रगती, विदा (डेटा ) किंवा माहितीची विपुल उपलब्धता, माहिती प्रक्रियेचे केंद्रीय संगणनाद्वारे (क्लाऊड कॉम्पुटिंग)  सुलभीकरण असून, हीच कारणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी उपयोगी ठरतात. या अद्ययावत क्षेत्राचा अभियांत्रिकीमध्ये समावेश करणे ही स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अर्टिफिशियल इंटेलिजेंस अणि डेटा सायन्स या शाखांचा समावेश केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मशीन लर्निंगचा वापर मशीनला डेटामधून स्वयंचलितपणे शिकण्याची परवानगी देते. मशीन लर्निंगचा एक सबसेट म्हणजे डीप लर्निंग, जे संगणकास अनुभवावरून शिकण्यास सक्षम करते आणि कृत्रिम तांत्रिक नेटवर्कच्या श्रेणीबद्ध स्तराचा वापर करण्यास सक्षम करते. हे नेटवर्क  मोठ्या प्रमाणात डेटा वापरून प्रशिक्षित केलेले असते. डेटा सायन्स हे माहिती तंत्रज्ञान व अप्लाइड सायन्स यांचा एकत्रित परिणाम म्हणता येईल, ज्यामुळे उद्योगांच्या दृष्टिकोनातून डेटा छाननी करणे, त्याचे प्रारूप ठरवणे, विश्लेषण करणे आणि  तो सादर करणे सुलभ होते. या तंत्रशुद्ध डेटा विश्लेषण पद्धतीमुळे उद्योगांना उत्कृष्ट व्यावसायिक निर्णय घेण्यात मदत होते.
एआय आणि डेटा विज्ञान क्षेत्रे

आरोग्य क्षेत्र :
हेल्थकेअर विभागात मशीन लर्निंग ही प्रणाली रुग्णांच्या वेगवान, स्वस्त आणि अचूक निदान करण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. 

उद्योग क्षेत्र :
बिझिनेस सेक्टरमध्ये, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनसारख्या अत्यंत पुनरावृत्तीय कार्ये विचारात घेऊन एआय प्रणाली  वेगवान आणि सहजतेने कामगिरी करते ज्याने वेळ, ऊर्जा, श्रम यांची बचत होते.

वित्तीय क्षेत्र :
वित्तीय क्षेत्रात, एआय वैयक्तिक वित्त अनुप्रयोगांवर लागू केले जाऊ शकते तसेच  वैयक्तिक डेटा संकलित करण्यास मदत करते. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात रोबोट्सद्वारे उत्पादन ही संकल्पना फर पूर्वीपासून राबवली जात 
आहे. गेमिंगमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. AI चा उपयोग करून मशीन संभाव्य पोझिशन्सच्या प्रचंड संख्येबद्दल विचार करू शकते अणि गेमप्लान बनवते. स्पीच रेकग्निशनमध्ये एआयचा उपयोग ऐकण्यासाठी आणि भाषा समजून घेण्यासाठी केला जातो.

शिक्षण क्षेत्र :
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग ठरवणे , निकल लावणे, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे आणि बरेच काही एआय स्वयंचलित प्रक्रियेद्वारे शक्य होते.

या उदाहरणांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान हे कॉम्प्युटर सायन्सचे सर्वांत आकर्षक आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे दिसेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, टेन्सरफ्लो, डेटा सायन्स आणि स्टॅटिस्टिक्समधील विविध कौशल्यांच्या विकासावर भर दिला जातो. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एआय अणि डेटा सायन्स या शाखांचा अभ्यासक्रमांत समावेश केला आहे. त्याअंतर्गत एआयएसएमएस, आयओआयटी, डी. वाय. पाटील, व्हीआयटी यांसारख्या पुण्यातील काही नामांकित महाविद्यालयांना २०२०-२१पासून परवानगी दिली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com