संधी नोकरीच्या : कॅम्पस प्लेसमेंटची सुरुवात

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 3 September 2020

विद्यार्थ्यांनो तयार राहा. कोरोनामुळे कॅम्पस प्लेसमेंटची थोडी उशिरा सुरुवात झाली असली, तरी नुकत्याच अंतिम वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच २०२१ बॅचचे प्लेसमेंट बऱ्याच महाविद्यालयात सुरू झाले आहे. त्यामुळे हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्येच बऱ्याचशा कंपन्यांच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी होतात. प्रत्येक वर्षाच्या जुलै महिन्यात साधारणपणे कॅम्पस रिक्रुटमेंटला कंपन्या सुरुवात करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या सावटाखाली कॅम्पस प्लेसमेंट यंदा होणार की नाही, अशी भीती अनेक विद्यार्थी, पालक तसेच कॉलेजेसच्या शिक्षक व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सच्या मनात होती. मात्र महिनाभर उशिरा का असेना, परंतु कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात झाल्याने महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आनंदी झाले आहेत. अनेक कंपन्यांकडून गेल्यावर्षीप्रमाणेच किंवा थोड्याफार कमी-जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांची मागणी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सकडे होत असल्यामुळे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स विद्यार्थ्यांकडून टेक्निकल, प्रोग्रॅमिंग, ॲप्टीट्यूड, सॉफ्ट स्किल व मुलाखतीची तयारी करून घेण्यात मग्न आहेत. 

विद्यार्थ्यांनी काय करावे? 

 • आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाची थोडक्यात उजळणी. 
 • जास्तीत जास्त सराव परीक्षा सोडविण्याचा प्रयत्न करावा. (कमीत कमी १५ ते २०) 
 • सर्व सराव परीक्षा घड्याळ समोर ठेवून दिलेल्या वेळात खऱ्या परीक्षेप्रमाणे सोडवाव्यात. 
 • आपल्या महाविद्यालयात येऊ घातलेल्या कंपन्यांची नावे टीपीओ कडून घेऊन त्या कंपनीच्या पॅटर्नची इंटरनेटवरून माहिती घ्यावी. 
 • कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपनीच्या पॅटर्नवर आधारित कमीत कमी ४ ते ५ सराव परीक्षा सोडवाव्यात. 
 • जवळपास सर्वच कंपन्या यंदा भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यासाठी इंटरनेटचा चांगला वेग व लॅपटॉपची व्यवस्था करून ठेवावी. 
 • इंटरनेट ऐनवेळी बंद झाल्यास दुसरी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. 
 • २ ते ३ मुलाखतींचा सराव करावा. 
 • मुलाखतीदरम्यान इतर आवाजाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सने (TPO) काय करावे? 

 • यावर्षी ज्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट करण्यास उत्सुक आहेत, त्यांची यादी बनवावी. 
 • विविध कंपन्यांच्या इतर महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कुठल्या कंपनीचे यंदा पॅटर्न काय आहेत ही माहिती घेऊन आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांमार्फत ती तयारी विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावी. 
 • मागील काही वर्षात आपल्या महाविद्यालयात तसेच आपल्या महाविद्यालयाच्या वर्गवारीप्रमाणे इतर चांगल्या महाविद्यालयात गेल्या काही वर्षात आलेल्या कंपन्यांशी संपर्क करून जास्तीत जास्त कंपन्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. 

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dr Shitalkumar Ravandale on Beginning of campus placement

Tags
टॉपिकस
Topic Tags: