संधी नोकरीच्या : ॲप्टिट्यूड परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली

Aptitude
Aptitude

सराव, सराव आणि फक्त सराव! हिच ॲप्टिट्यूड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यशाची गुरुकिल्ली असते. कुठल्याही कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वांत महत्त्वाची व पहिली पायरी ॲप्टिट्युडची परीक्षा असते. अनेक कंपन्यांनी दोन वर्षांपासून ॲप्टीट्युडबरोबरच प्रोग्रामिंगची परीक्षाही अनिवार्य केली आहे. मात्र, यापूर्वी फक्त ॲप्टीट्युडची परीक्षा व त्यानंतर थेट मुलाखत घेतली जायची. दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कमीत कमी वेळेत शोधण्यासाठी प्रचंड सरावाची आवश्यकता असते. प्रत्येक विद्यार्थ्याने ॲप्टिट्युडच्या कमीत कमी २० ते २५ सराव परीक्षा दिलेल्या वेळेत खऱ्या परीक्षेप्रमाणे वेळ लावून सोडविल्याच पाहिजेत. 

मेगाभरती करणाऱ्या कुठल्याही कंपनीसाठी मेहनत घ्यायला हवी व त्यासाठी अशा कंपनीच्या भरतीच्या आधीच ॲप्टिट्युडची सर्व तयारी सराव परीक्षांसहित पूर्ण व्हायला हवी. मेगाभरतीच्या प्रत्येक कंपनीच्या पॅटर्नवर आधारित कमीत कमी ५ सराव परीक्षा (Company Specific) दिलेल्या वेळेतच खऱ्या परीक्षेप्रमाणे सोडवाव्यात. 

ॲप्टिट्यूड परीक्षेचा अभ्यास कधी सुरू करावा? 
कंपन्यांची कॅम्पस प्लेसमेंट भरती साधारणपणे प्रत्येक वर्षाच्या जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होते. त्यामुळे त्या आधीच विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण व्हायला हवी. आधीच्या वर्षातच सुमारे ८० ते १०० तासांचा ॲप्टिट्यूड कोर्स संपायला हवा. जून महिन्यातील सुट्ट्यांमध्ये एक आठवड्याचा रिव्हिजन कोर्स व त्यानंतर ॲप्टिट्युडच्या सराव परीक्षा सोडवायला हव्यात. पदवीच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबरच दुसऱ्या वर्षापासून ॲप्टिट्युडची तयारी सुरू करायला हवी. कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या बऱ्याचशा महाविद्यालयांत दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात ॲप्टिट्युडची तयारी इतर विषयांप्रमाणेच अनिवार्य केलेली असते. बरीचशी महाविद्यालये हा ॲप्टिट्युडचा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करतात किंवा अतिरिक्त वेळेत महाविद्यालयातच त्याचे प्रशिक्षण देतात. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसमार्फत महाविद्यालयातच याचे प्रशिक्षण करून घेतले पाहिजे.

ॲप्टिट्यूडच्या ऐंशी ते शंभर तासांच्या कोर्ससाठी दोन पर्याय उपलब्ध असतात
1) दोन सत्रात प्रत्येकी ४० ते ५० तासांचा कोर्स इतर विषयांप्रमाणेच टाइम टेबल मध्ये समाविष्ट करून घेणे. 
2) सलग दहा दिवस रोज आठ ते दहा तासांचा कोर्स करणे. 

आजकाल कितीतरी चांगल्या वेबसाईट्सवर असे ॲप्टिट्युडचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, तसेच काही मोबाइल ॲप्सही उपयुक्त आहेत. 

एमबीएची प्रवेश परीक्षा CAT वा CET तसेच GMAT किंवा GRE ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ॲप्टिट्युडची तयारी चांगली झालेली असते. त्यांना बऱ्याचशा कंपन्यांची ॲप्टिट्युडची परीक्षा खूपच सोपी वाटते. ४ ते ५ विद्यार्थी मिळून देखील ॲप्टिट्युडची तयारी एकत्रितपणे करू शकतात. प्रत्येकाने ३ ते ४ टॉपिक्स वाचायचे व आपण केलेल्या अभ्यासाची इतरांना कमी वेळात माहिती द्यायची, त्याचप्रमाणे ग्रुपचे इतर सदस्यदेखील आपापल्या इतर टॉपिक्सची माहिती इतरांना देतील. या पद्धतीने कमी वेळेत चांगली तयारी होते. हाच ग्रुप नंतर २० ते २५ सराव परीक्षा तसेच मेगाभरती करणाऱ्या प्रत्येक कंपनीसाठी त्या कंपनीच्या पॅटर्नवर आधारित प्रत्येकी ४ ते ५ सराव परीक्षाही एकत्रितपणे सोडवू शकतो. ग्रुपमधील सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो.

उपयुक्त मोबाईल ॲप्स
    ॲप     डाऊनलोड     रेटिंग 

    Indiabix     500K+     4.7 
    Pocket     500K+     4.4 
    Aptitude
    M4maths     100K+     4.5 
    MathApp     500K+    4.7 
    Gradeup     10M+     4.6 
    Smartkeeda     50K+     3.3 
    Testbook     5M+     4.6 
    Adda247     5M+     4.5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com