शुभं भवतु...!

डॉ. श्रीराम गीत
Saturday, 28 December 2019

दै. ‘सकाळ’ने करिअरचा, करिअर शब्दाभोवती मांडियेला खेळ आज संपणार आहे. ज्यांची मुले-मुली शिकत आहेत, त्यांना सर्वांत प्राधान्य देऊन या खेळाची वर्षाच्या सुरुवातीपासून आखणी माझ्यासमोर होती. मात्र त्याच वेळी काठावर बसून शिकवणारे माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसाठीसुद्धा चमचाभर मीठमसाला क्वचित मिरचीचा खर्डासुद्धा या करिअर खेळात टाकला जात असे.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
दै. ‘सकाळ’ने करिअरचा, करिअर शब्दाभोवती मांडियेला खेळ आज संपणार आहे. ज्यांची मुले-मुली शिकत आहेत, त्यांना सर्वांत प्राधान्य देऊन या खेळाची वर्षाच्या सुरुवातीपासून आखणी माझ्यासमोर होती. मात्र त्याच वेळी काठावर बसून शिकवणारे माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसाठीसुद्धा चमचाभर मीठमसाला क्वचित मिरचीचा खर्डासुद्धा या करिअर खेळात टाकला जात असे. उच्चशिक्षणाच्या चकचकीत बाजाराबद्दल काही लिहावे किंवा त्यातून काही बोध घ्यावा असे पालकांच्या, प्राध्यापकांच्या किंवा अगदी प्राचार्यांच्या हाती काही राहिलेले नाही, हे लक्षात घेऊन करिअरबद्दलची माझी त्रयस्थ निरीक्षणे या साऱ्या वर्षभराच्या प्रवासात मांडत गेलो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी वर उल्लेख केलेल्या, साऱ्यांकडून म्हणजेच पालक, शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांकडून सकारात्मक प्रोत्साहनपर प्रतिसाद मला मिळत गेला याचा आनंद नमूद करत आहे. महिन्यातून एकदा तरी ‘सकाळ’च्या संपादकांबरोबर बोलताना वाचक प्रतिसादाचा अंदाज मिळत असे. यंदाच्या पावसाप्रमाणेच तो चकित करणारा होता. तीस वर्षांच्या यशस्वी वैद्यकीय व्यावसायिकाच्या भूमिकेतून करिअर मार्गदर्शक ही वीस वर्षांपूर्वी मी नव्याने स्वीकारलेली करिअर, त्यातील वाटचाल आजही गरजेची आहे, उपयुक्त आहे, एवढेच नव्हे तर अशा कामात येणाऱ्यांची संख्या गावोगावी वाढण्याची खूप गरज आहे हेसुद्धा सतत जाणवत होते. खरेतर अशा उत्सुक करिअर मार्गदर्शकांसाठी हे सारे लेखांचे एकत्रित वाचन हीच सुरुवात ठरू शकेल. आमच्या मुलामुलींना उपयोग झाला, मार्गदर्शन छान झाले हे ऐकायला असे गावोगावी मार्गदर्शक तयार व्हावेत ही माझी छोटीशी इच्छा व्यक्त करून सध्या तरी थांबतो. 

सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git