भविष्य नोकऱ्यांचे : ‘एआय’द्वारे प्रारूपांतील पदांची उकल 

डॉ. आशिष तेंडुलकर 
Thursday, 27 August 2020

आपण लिनिअर रिग्रेशन या तंत्राविषयी माहिती घेतली. पहिल्या लेखात तोंडओळख आणि मागच्या लेखात त्याविषयीच्या तांत्रिक बाजू! आजच्या लेखात आपण प्रारूपांतील पदांची उकल ऑप्टिमिझेशन या तंत्राने कशी करतात याची माहिती घेऊया. 

आपण रेषीय प्रतिगमन अर्थात लिनिअर रिग्रेशन या तंत्राविषयी माहिती घेतली. पहिल्या लेखात तोंडओळख आणि मागच्या लेखात त्याविषयीच्या तांत्रिक बाजू! आजच्या लेखात आपण प्रारूपांतील पदांची उकल ऑप्टिमिझेशन या तंत्राने कशी करतात याची माहिती घेऊया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उजळणीदाखल आपण पुढील रेषीय समीकरणाचा प्रारूप म्हणून उपयोग केला. किंमत = अ + ब * क्षेत्रफळ. ढोबळमानाने य = अ + ब * क्ष. तालीम संचामध्ये आपल्याला ‘क्ष’ आणि ‘य’ यांच्या किमती दिलेल्या असतात आणि आपल्याला भविष्यामध्ये दिलेल्या ‘क्ष’साठी ‘य’ची किंमत शोधून काढायची आहे. मागच्या भागात आपण ‘लॉस फंक्शन’ या संकल्पनेचा वापर करून ‘अ’ आणि ‘ब’ या पदांची कशी उकल करावी याचा उहापोह केला. हे काम कार्यक्षमपणे करण्यासाठी ऑप्टिमिझेशनमधील काही संकल्पनांचा वापर होतो. ऑप्टिमिझेशन ही गणिताची एक उपशाखा आहे. इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जवळजवळ सर्वच प्रारूपांच्या उकलीमध्ये उतार किंवा चढाव प्रवणता (ग्रेडिएंट डिसेंट) या तंत्राचा वापर केला जातो. गंमत म्हणजे. उतार किंवा चढाव प्रवणता ही अकरावी किंवा बारावीत शिकलेल्या डेरिव्हेटीव्ह या संकल्पनेवर आधारित आहे. आपल्याला माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकलेल्या गणिताचे उपयोग सहसा सांगितले जात नाहीत आणि त्यामुळे आपण ते निव्वळ परीक्षेपुरते वापरून विसरून जातो. आजची संकल्पना वाचल्यावर तुमच्या लक्षात येईन की, शाळकरी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन वयात शिकलेल्या गणितीय संकल्पना किती उपयुक्त असतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article how to optimize the positions in the drafts with this technique

Tags
टॉपिकस
Topic Tags: