इम्‍प्रूव्ह युवरसेल्फ : एका ‘बिझी’ दिवसाची गोष्ट...

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 6 February 2020

एकदा एमबीएच्या विद्यार्थ्याने मला विचारले, ‘‘सर, तुम्ही काम करत नसता त्या दिवशी तुमच्याकडे भरपूर रिकामा वेळ असेल ना? मग दिवसभरात तुम्ही काय करता? तुम्हाला बोअर होत नाही का?’’ ओह, मला त्याला उत्तर देण्याची गरज होती. मी त्याला त्या दिवशी काय करतो, हे सांगितले.

एकदा एमबीएच्या विद्यार्थ्याने मला विचारले, ‘‘सर, तुम्ही काम करत नसता त्या दिवशी तुमच्याकडे भरपूर रिकामा वेळ असेल ना? मग दिवसभरात तुम्ही काय करता? तुम्हाला बोअर होत नाही का?’’ ओह, मला त्याला उत्तर देण्याची गरज होती. मी त्याला त्या दिवशी काय करतो, हे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 • मी सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो. त्यानंतर, १६व्या मजल्यावरील माझ्या घराच्या बाल्कनीतून उगवत्या सूर्याला आणि आकाशाला वंदन करतो. शहराला ‘हॅप्पी हॅलो’ म्हणतो.
 • त्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळचा फेरफटका घेतो.
 • सकाळचे संगीत ऐकतो.
 • फुलांशेजारून जाताना त्यांचा सुवास घेतो.
 • मला भेटणाऱ्या लोकांना अभिवादन करतो.
 • सूर्याची कोवळी किरणे आणि हवा अनुभवल्यानंतर माझ्या घरी परततो. 
 • त्यानंतर पत्नीसोबत चहाचा आस्वाद घेतो.
 • माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बातम्यांसाठी वृत्तपत्र वाचतो. मला अशा थोड्या बातम्या सापडतात आणि माझा हा ‘बिझी’ दिवस सुरू होतो.

त्यानंतर दिवसभरातही वेगवेगळ्या गोष्टी मी करतो.

 • मी वाचतो, विचार करतो, या विचारांची देवाणघेवाण करतो, लिहितो, देशभरातून तसेच काही वेळा परदेशातून आलेल्या फोन्सवर बोलतो.
 • नवीन स्लाइडच्या मदतीने माझे प्रेझेंटेशन अपडेट करतो. काही जणांनी केलेल्या चौकशांमधून सुखद आश्चर्याचा धक्का बसतो. नव्याने काही शिकायला मिळते.  
 • व्हॉट्‌सॲपवरील  मेसेज आणि ई-मेल्सनाही उत्तरे देतो.
 • बाजारात जातो. काही वस्तू घेतो आणि त्या वेळी काही धडेही शिकतो.

या सर्व गोष्टींमध्ये माझ्या नातवाबरोबर घालवलेले क्षण सर्वांत सुंदर असतात. माझ्या दुसऱ्या आणि दिवसातील शेवटच्या चहाने संध्याकाळची सुरवात होते. एखादी आवडती सीरियल पाहत मी चहा घेतो. दिवसभर मी लिंक्डइनवरही बराचसा वेळ घालवतो. कॉमेंटना प्रतिसाद देतो. मला मिळालेल्या लाइक्समुळे आनंदी होतो. एवढे सर्व सांगितल्यावर मी त्या विद्यार्थ्याला विचारले, ‘‘मी काम नसलेल्या दिवशी एक क्षणही रिकामा नसतो आणि तू मी रिकामा वेळ कसा घालवतो, हे विचारतो?’’ खरेतर रिकाम्या, मोकळ्या वेळेचा किंवा ‘बोअरडम’चा अर्थही मला कधीही समजला नाही. ते आपल्यावर अवलंबून  असते. अशा दिवशीही करण्यासारखे खूप काही असते, नाही का?
खरेतर, एवढे सर्व केल्यानंतरही यादिवशी काही गोष्टी करायच्या राहून जातात. त्यांचा उल्लेख अर्थातच मला गरजेचा वाटत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud