इम्प्रूव्ह युअरसेल्फ : सराव विनम्रतेचा...

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 12 March 2020

मी माझ्या कार्यशाळेतील आंतरवैयक्तिक कौशल्यावरील छोटे सत्र नुकतेच संपवले होते. एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र होते. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा विद्यार्थी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘सर, मला तुमची मदत हवी आहे. मी माझ्या मित्रांशी तसेच इतरांशीही काहीशा उद्धटपणे वागतो, असे मला वाटते.’ 

मी माझ्या कार्यशाळेतील आंतरवैयक्तिक कौशल्यावरील छोटे सत्र नुकतेच संपवले होते. एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र होते. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा विद्यार्थी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘सर, मला तुमची मदत हवी आहे. मी माझ्या मित्रांशी तसेच इतरांशीही काहीशा उद्धटपणे वागतो, असे मला वाटते.’ 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरेतर, तुम्ही इतर अनेक विद्यार्थ्यांच्या गराड्यात असताना अशा प्रकारच्या वैयक्तिक प्रश्‍नांना उत्तर देणे अवघडच असते. तरीपण त्याचे समाधान करत मी म्हणालो, ‘ठीक आहे. तुझ्यातील क्षमतेमुळे तू नेहमीच प्रकाशझोतात असतो. तुझ्यामध्ये श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते. इतरांकडून कौतुकाचा वर्षावही होतो. त्यामुळे तुझ्यामध्ये उद्धटपणा विकसित होणे, स्वाभाविकच आहे.’ त्यावर तो म्हणाला, ‘मला या भावनेवर मात करण्याची इच्छा आहे.’ मी त्याला उपाय सुचवत म्हणालो, ‘विनम्रतेचा सराव कर.’ 

यावर व्यवस्थापनशास्त्राच्या या विद्यार्थ्याने पुन्हा मला प्रश्‍न केला, ‘मी हे कसे करू?’ 
मी म्हणालो, ‘मुला, आपण एखाद्याबद्दल उद्धट होतोय, असे तुला जाणवेल, त्यावेळी तू त्या व्यक्तीमध्ये तुझ्यापेक्षा अधिक काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न कर.’ 

मित्राचा हात हातात धरून त्याने परत मला विचारले, ‘सर, मला आता त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा अधिक काही चांगले सापडत नाही.’ मी त्याच्या मित्राकडे पाहून म्हणालो, ‘तो तुझ्यापेक्षा उंच नाही का? त्यामुळे तू त्याला सांग की तो नशीबवान आहे. एखाद्या मॉडेलसारखा उंच आहे. तुही याबद्दल त्याचे कौतुक कर. सामान्यत: हुशार पण उद्धट व्यक्तींना मित्र मिळत नाहीत. त्यामुळे तुला एक मित्र म्हणून त्याची गरज आहे, नाही का? त्याच्याबद्दल कृतज्ञ राहण्याचे हे आणखी एक कारण होय.’ त्याने माझे सर्व बोलणे लक्ष देऊन एकले. त्यानंतर माझा हात आपल्या हातात धरून म्हणाला, ‘मी सराव करेन, सर.’ 
तुम्हीपण तो सुरू करताय ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud