बी परफेक्ट : महत्व माफी मागण्याचे...

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 9 January 2020

आयुष्यात आपण अनेकदा समोरच्याला सहजपणे दुखावतो. मात्र अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामागील पार्श्‍वभूमी आपण समजून घेत नाही. आपल्या लक्षात येईल तेव्हा माफी मागायला काय हरकत आहे. ही ऑगस्ट १९७९मधील एका संध्याकाळची गोष्ट. मी टेबल टेनिसच्या जिल्हा संघामधील सदस्य होतो. तरीही काही कारणामुळे माझ्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.

आयुष्यात आपण अनेकदा समोरच्याला सहजपणे दुखावतो. मात्र अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामागील पार्श्‍वभूमी आपण समजून घेत नाही. आपल्या लक्षात येईल तेव्हा माफी मागायला काय हरकत आहे. ही ऑगस्ट १९७९ मधील एका संध्याकाळची गोष्ट. मी टेबल टेनिसच्या जिल्हा संघामधील सदस्य होतो. तरीही काही कारणामुळे माझ्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. यामुळे मी फारच निराश झालो. खूप रागावलो. मी या संतापाच्या भरात थेट या सर्वाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीकडे गेलो. तिला जाब विचारत अपमान केला. खरेतर ती खूपच वरिष्ठ व्यक्ती होती. माझ्या बोलण्यानंतर त्यांनी हातात धरलेल्या ग्लासातील पाणी थेट माझ्या तोंडावर फेकले. त्यानंतर अनेक वर्षे मी या व्यक्तीबद्दल आकस, तिरस्कार बाळगला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी पण जबाबदार होतो
ते १९९४ वर्ष होते. मी डॉ. वेन डायरचे ‘यू वील सी इट व्हेन यू बिलिव्ह इट’ हे पुस्तक वाचले. त्यातील क्षमाशीलतेच्या प्रकरणाचा माझ्यावर प्रभाव पडला. त्यानंतर, भूतकाळात दुखावलेल्या व्यक्तींची माफी मागण्याचे मी ठरविले. जीवन पुन्हा एकदा प्रवाही बनवण्यासाठी मला याची गरज वाटत होती. त्यानंतर मी अशा दहा व्यक्तींची यादी तयार केली. विशेष म्हणजे, एकेकाळी माझ्या चेहऱ्यावर पाणी फेकणाऱ्या त्या व्यक्तीचेही नाव यात होते. तेव्हा माझ्या मनाने मला प्रश्‍न केला, ‘या यादीत त्या व्यक्तीचे नाव का? तिने तर तुझ्या चेहऱ्यावर पाणी फेकले होते.’ याच वेळी हृदयाने युक्तिवाद केला, ‘तू तिचे नाव माफी मागणाऱ्या व्यक्तींच्या यादीत घेतले, ते बरोबर आहे. कारण नेमके कशामुळे ती व्यक्ती असे वागली, हे पाहण्याची गरज आहे. तू तेव्हा खूपच वाईट परिस्थितीतून जात होतास. या घटनेला तू पण जबाबदार होतास.’ मी माझ्या हृदयाचे एकले. त्यानंतर दशकभराने त्या व्यक्तीला शोधले. तिचे हात धरून मी स्पष्टपणे, आत्मविश्‍वासाने त्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली. तो माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर अनुभवांपैकी होता. ती व्यक्ती भारावलेल्या स्वरात म्हणाली, ‘हा माझ्यासाठी खरंच खूप आश्‍चर्यकारक अनुभव आहे.

मी आत्तापर्यंत कधीही, कुणाकडून अशी अपेक्षा ठेवली नव्हती.’ दोन आठवड्यामध्ये मी यादीतील सर्व दहा जणांची माफी मागितली. त्यातून जीवनाचा प्रवाह पुन्हा वाहू लागला. तुम्ही अशी यादी कधी करताय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on Apologies for the importance