esakal | इम्प्रूव्ह युअरसेल्फ : मानवी वर्तन आणि संदर्भ...
sakal

बोलून बातमी शोधा

Human behavior

एके दिवशी एक तरुणी मला म्हणाली, ‘सर, मी खूप निराश झाले आहे. माझ्या कार्यालयातील एक माझ्याशी नेहमीच चांगलं वागत असायची. ती मला नेहमी मदतही करायची. ती खरोखरच खूप दयाळू आणि छान अशी व्यक्ती आहे. अचानक तिनं माझ्याशी बोलणं बंद केलंय. त्यामुळं मला खूप वाईट वाटतंय. मी तिला विचारलं की, माझी काही चूक झाली असल्यास निदान मला सांग तरी.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ : मानवी वर्तन आणि संदर्भ...

sakal_logo
By
रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर

एके दिवशी एक तरुणी मला म्हणाली, ‘सर, मी खूप निराश झाले आहे. माझ्या कार्यालयातील एक माझ्याशी नेहमीच चांगलं वागत असायची. ती मला नेहमी मदतही करायची. ती खरोखरच खूप दयाळू आणि छान अशी व्यक्ती आहे. अचानक तिनं माझ्याशी बोलणं बंद केलंय. त्यामुळं मला खूप वाईट वाटतंय. मी तिला विचारलं की, माझी काही चूक झाली असल्यास निदान मला सांग तरी. पण त्यानंतरही तिनं मला काहीच सांगितलं नाही. मी या विचारात खूप अडकून पडलेय. मला यातून बाहेर येण्याची इच्छा आहे.’

ती तरुणी तळमळीनं बोलत होती. मी तिचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेतलं. ती दु:खी दिसत होती. 

मी म्हणालो, ‘ठीक आहे. त्या व्यक्तीनं काहीतरी चूक केलीय, अशी शक्यता आहे का? ती तुझ्याबद्दलच्या गप्पांमध्ये सहभागी झाली असेल आणि त्यातून तिच्या मनात एक प्रकारचा अपराधीभाव निर्माण झालेला असू शकतो. त्यातूनच ती तुझ्याशी बोलत नसेल. त्यामुळं तुझा यात काहीच दोष नसेल. तुझा या सर्व प्रकरणाशी काही संबंध नसेल. त्यामुळं काही दिवस जाऊ दे. ती व्यक्ती स्वतःहून तुझ्याकडं येईल. स्वतःच्या चुकीची कबुलीही देईल. सर्व काही ठीक होईल. त्यामुळं निवांत राहा. कोणताही तणाव घेऊ नकोस.’ 

त्यानंतर खरोखरच काही दिवसांनी मी म्हटल्याप्रमाणं घडलं. मला हे कसं समजलं, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मी महाविद्यालयात होतो, तेव्हाची गोष्ट. मीही याच कारणावरून माझ्या एका मित्राशी बोलणं थांबवलं होतं.  

आपण आयुष्यात अनेकदा नेहमीपेक्षा वेगळ्या, विचित्र पद्धतीनं वागतो. मात्र, आपल्या मनासाठी ते सामान्य असतं. मनानंच ते स्वीकारलेलं असतं. 

तुम्हीही या तरुणीसारखा अनुभव घेतला असेल ना? तुम्हालाही आता नवीन दृष्टिकोन मिळाला असेल.