esakal | इम्प्रूव्ह युअरसेल्फ : आनंदी आठवणी जागविताना...
sakal

बोलून बातमी शोधा

इम्प्रूव्ह युअरसेल्फ : आनंदी आठवणी जागविताना...

सध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्या सर्वांनाच स्वत:च्या व इतरांच्या संरक्षणासाठी घरामध्ये थांबावे लागतेय. त्यामुळे, आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याकडे वळून पाहण्यासाठी हा वेळ घालविण्याची कल्पना चांगली आहे. आयुष्यातील आनंदी आठवणी आपल्याला प्रसन्न, चैतन्यदायी ठेवण्यास मदत करतात.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ : आनंदी आठवणी जागविताना...

sakal_logo
By
रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर

सध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्या सर्वांनाच स्वत:च्या व इतरांच्या संरक्षणासाठी घरामध्ये थांबावे लागतेय. त्यामुळे, आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याकडे वळून पाहण्यासाठी हा वेळ घालविण्याची कल्पना चांगली आहे. आयुष्यातील आनंदी आठवणी आपल्याला प्रसन्न, चैतन्यदायी ठेवण्यास मदत करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्ही काहीवेळा काहीजणांना मदत केलेली असेल. प्रसंगी गरजू व्यक्तींना तुमच्या दयाळूवृत्तीतून दया दाखविली असेल. तुम्ही काहीजणांसाठी आदरणीय असाल. त्याचप्रमाणे, तुम्ही प्रेमळ आणि काळजी घेणारेही असाल, तर काहीजणांना तुमच्याबद्दल भीतीयुक्त आदर वाटत असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात उदात्त ध्येयांचा पाठपुरावा केला असेल. तुमच्या आरोग्याची काळजीही तुम्ही घेतली असेल. भूतकाळात तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्कृष्टता मिळविली असेल, त्यामुळे तुम्हाला स्वत:लाच आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला असेल. तुम्ही योग्य गोष्टी करायला शिकलात. तुम्ही तुमच्या यापूर्वीच्या आयुष्यात अनेक योग्य गोष्टी केल्या असतील. 

त्याचप्रमाणे, तुम्ही प्रचंड रागाच्या क्षणांचाही अनुभव घेतला असेल. त्यावेळी, तुम्ही इतके रागावला होतात, की रागाच्या भरात एखाद्याला थप्पडही मारणार होता. मात्र, तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवले. तुम्ही या अत्यंत क्रोधीत क्षणी कुणालातरी शिवीगाळ करण्यापूर्वीही स्वत:ला सावरले असेल. आपण करू पाहत असलेल्या कृतीचे भयंकर परिणाम होऊ शकतात, असा विचार करून तुम्ही स्वतःचे संतुलन राखले असेल. वाह...या सर्ववेळी तुम्ही तुमची पाठ थोपटायलाच हवी. स्वतःच स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही तुमच्या सुंदर भूतकाळातील तशाच आठवणींना अशा पद्धतीने नुकताच उजाळा दिला. तुम्हाला आता चांगले वाटले असेल. अजूनही तुम्ही मनामध्ये ‘फील गुड’ची भावना अनुभवत असाल. हे सर्व घडले कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही क्षण अशा पद्धतीने व्यतित केले, ज्यांनी तुमच्यासाठी आनंदी क्षण, आनंदी आठवणी तयार केल्या. 

खरंतर आयुष्याची आपल्याकडून या एकमेव गोष्टीची मागणी असते, योग्य पद्धतीने योग्य गोष्टी करून आनंदी आठवणी तयार करणे. तुम्ही योग्य मार्गावर आहात, नाही का? आयुष्याच्या याच मार्गावरून चालत राहा. आपण समजतो त्यापेक्षा आयुष्य खूपच चांगले असते.