esakal | इम्प्रूव्ह युअरसेल्फ : सातत्यपूर्ण सुधारणेबद्दल....
sakal

बोलून बातमी शोधा

Improve-Yourself

‘मला कुठल्याही कामामध्ये माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची इच्छा आहे,’’ तो तरुण मला म्हणाला.
‘अरे, मग तुला कोण रोखतेय?’’ मी त्याला विचारले.
‘मला कोणीही थांबवत नाही. तो प्रश्‍न नाही. मला माझी सर्वोत्तम पातळी काय आहे, हे  माहीत नाही, हाच केवळ मुद्दा आहे,’’ त्याने मला पुन्हा सांगितले.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ : सातत्यपूर्ण सुधारणेबद्दल....

sakal_logo
By
रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर

‘मला कुठल्याही कामामध्ये माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची इच्छा आहे,’’ तो तरुण मला म्हणाला.
‘अरे, मग तुला कोण रोखतेय?’’ मी त्याला विचारले.
‘मला कोणीही थांबवत नाही. तो प्रश्‍न नाही. मला माझी सर्वोत्तम पातळी काय आहे, हे  माहीत नाही, हाच केवळ मुद्दा आहे,’’ त्याने मला पुन्हा सांगितले.
‘मग तू ती माहीत करून घे,’’ मी त्याला पुन्हा म्हणालो.  
‘मी ती नेमकी कशी माहीत करून घेऊ,’’ काहीतरी करू पाहणाऱ्या त्या युवकाने मला आणखी प्रश्‍न केला.
‘तू प्रत्येक वेळी मागच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्ध‌तीने ते काम केल्यास एक दिवस तू तुझ्या सर्वोत्तम दर्जावर पोचू शकतोस,’’ मी त्याचा गोंधळ कमी करत म्हणालो.
‘पण, मी त्या कामामध्ये सर्वोत्तम दर्जावर पोचलो, हे मला कसे समजेल,’’ त्याने पुन्हा प्रतिप्रश्‍न केला.
‘तुला आता आपला मागच्यावेळचा अधिक चांगला परिणाम आता कोणत्याही कारणासाठी आणखी सुधारता येणार नाही, असे वाटेल, त्यावेळी तुला तुझ्यामधील सर्वोत्तम सापडेल आणि तुझा हा प्रवास थांबेल,’’ मी त्याच्या पुढील प्रश्‍नाचे उत्तर दिले. आता आमच्या संभाषणाचा प्रवासही समाप्त होत होता.
‘अच्छा तर मग, मला आता सुरुवात करू द्या.’’
‘ही चांगली गोष्ट आहे,’’ मी त्याला शुभेच्छा देत म्हणालो. त्यानंतर आम्ही दोघेही हसलो.
त्याने कुठलेही काम प्रत्येक वेळी अधिक चांगले करणे सुरूच ठेवले असेल, याची मला खात्री आहे. खरेतर, सर्वोत्तम कधीही मिळत नाही. आपण प्रत्येक वेळी सतत सुधारणा करत राहायला हवी. तुम्हीही या तरुणाप्रमाणेच तुमचा ‘सर्वोत्तम’ मिळविण्याचा प्रवास सुरू करताय ना?