इम्प्रूव्ह युअरसेल्फ : जगातील चांगुलपणाबद्दल

रमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर
Thursday, 28 May 2020

एके दिवशीची गोष्ट. मी एके ठिकाणी जाण्यासाठी एका रिक्षात बसलो. रिक्षाचालकाला तिकडे नेण्याची सूचना केली. खरे तर ते अंतर थोडेच होते.
मी रिक्षाचालकाला विचारले, ‘‘तुम्ही किती पैसे घ्याल?’’
तो म्हणाला, ‘‘सर, तुम्हाला योग्य वाटतील तितके द्या.’’

एके दिवशीची गोष्ट. मी एके ठिकाणी जाण्यासाठी एका रिक्षात बसलो. रिक्षाचालकाला तिकडे नेण्याची सूचना केली. खरे तर ते अंतर थोडेच होते.
मी रिक्षाचालकाला विचारले, ‘‘तुम्ही किती पैसे घ्याल?’’
तो म्हणाला, ‘‘सर, तुम्हाला योग्य वाटतील तितके द्या.’’

माझे ठिकाण आल्यावर मी रिक्षातून उतरलो. खिशातून ५० रुपयाची नोट काढून रिक्षाचालकाला दिली. त्यानंतर, प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागलो. तितक्यात रिक्षाचालकाने मला हाक मारली. त्याने मला १० रुपये परत दिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला.
‘‘तुम्ही असे का केले?’’ मी विचारले.
‘‘सर, या अंतराचे ४० रुपये होतात,’’ त्याने मला स्पष्ट केले.
‘‘ओह...मला माहित नव्हते,’’ मी आश्चर्याच्या धक्क्यातून अजूनही सावरलो नव्हतो.

‘‘सर, पण मला माहीत आहे,’’ तो म्हणाला.
खरे तर अशा प्रकारच्या कृती माणसांमधील चांगुलपणावरचा विश्वास नेहमीच वाढवतात. आपल्यापैकी अनेकजण हल्लीच्या दिवसांत जग वाईट होत चाललेय, असे म्हणत असतात. पण, मला तसे वाटत नाही. अजूनही मोठ्या प्रमाणावर लोक प्रत्येक दिवशी घरी सुखरूप पोचतात. त्याचप्रमाणे, आजही कुणीतरी दुसऱ्या कुणाला सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. अनेकजण कोरोना संसर्ग व लॉकडाउनमधून सावरण्यासाठीही इतरांना मदत करत आहेत. अद्यापही, वाईट वर्तुणुकीच्या एका अनुभवानंतर तुमच्यापैकी प्रत्येकाला दहा चांगल्या, सभ्य वर्तणुकीच्या घटनांचा अनुभव येतो. अधिकाधिक लोक कोरोनाला रोखण्यासाठी, चांगले वाटण्यासाठी घरातच व्यायाम करत आहेत. ज्यामुळे, त्यांना पूर्ण दिवसभर चांगले वाटू शकते. इतरांना प्रोत्साहित करत आहेत. मार्गदर्शन देत आहेत. ही यादी आता आणखी वाढवता येऊ शकते.

मला एवढेच म्हणायचेय की, जग अजूनही खूप चांगले आहे. आता प्रत्येक दिवशी आपण स्वत:मध्ये सुधारणा करून ते अधिक चांगले बनवू शकतो. आपण आपल्याभोवतीचे छोटे जग सुंदर बनवतो, तेव्हा एकप्रकारे पूर्ण जगही चांगलेच बनविलेले असते. विचार करा. तुम्हाला काय वाटते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself