इम्प्रूव्ह युअरसेल्फ : हृदयात फुलवा स्मितहास्याचा आनंद

Hands
Hands

तो दररोज सकाळी फिरायला गेल्यावर माझ्याशेजारून जात असे, तरीही तो माझ्याकडे पाहून साधे अभिवादनही करत नसे. एके दिवशी सकाळी नेहमीसारखे फिरायला गेल्यावर तो समोरून येताना दिसला. मी आज ही कोंडी फोडायची, असे ठरविले. तो जवळ आला. मी त्याला नम्र, पण ऐकू जाईल अशा आवाजात ‘सुप्रभात’ म्हणालो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर त्याने आपली चालण्याची गती कमी केली. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे स्मितहास्य पसरले. एक प्रकारचे तेज चेहऱ्यावर उमटले. त्याने मला आनंदी स्वरात प्रतिसाद दिला, ‘सुप्रभात’. त्यानंतर आम्ही आमच्या दिशेने गेलो. आम्ही एकमेकांना सुप्रभात केले; मात्र, एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी थांबलो नाही. त्यासाठी ही वेळ योग्य वाटत नव्हती. 

अनेक वेळा काही लोक इतरांनी पहिले पाऊल उचलण्याची वाट पाहतात. ते ठीकही आहे. त्याचा अर्थ असा नसतो की, अशा व्यक्तींच्या अंतरंगात आनंद नसतो. फक्त त्यांना इतरांशी काही शेअर करण्याच्या हेतूतून स्वत:हून पुढाकार कसा घ्यायचा, याची जाणीव नसते. खरे तर प्रत्येकालाच आपली ओळख करून द्यायला आवडते. त्यामुळे आपण इतर कुणी पुढाकार घेण्यापेक्षा स्वत: पुढाकार घेऊ शकतो. प्रेम आणि आपुलकीचे बीज रोवून इतरांच्या दिवसात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी आपण आपल्या हृदयात हास्य फुलविण्याची गरज असते. सध्याच्या कोरोना‌ संसर्गाच्या काळात सुरक्षित अंतर ठेवत दूरवरून हात हलवूनही आपण अभिवादन करू शकतो. त्यामुळेही त्या व्यक्तीला छान वाटेल. नाही का?

मी तर माझ्या हृदयात हास्य फुलविलेय. उगवत्या सूर्याच्या किरणांना मी माझ्या डोळ्यांच्या माध्यमातून अंतरंगात प्रवेश करू देतो. सकाळची ताजी फुलेही सुगंधही देऊ करतात. तुम्हीही माझ्याप्रमाणे तुमच्या हृदयामध्ये स्मितहास्याची बीजे पेरू शकता. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com