इम्प्रूव्ह युअरसेल्फ : मनाचा तोल गमावताना....

Improve-Yourself
Improve-Yourself
Updated on

‘तू, एवढा निराश का दिसतोयस?’’ मी एका मुलाला विचारले. ‘‘सर, सकाळी माझा भाऊ माझ्याशी उद्धटपणे वागला,’’ तो म्हणाला. 
‘तो नेहमीच तुझ्याशी उद्धटपणे वागतो का?’’ मी विचारले. 
‘नाही सर,’’ त्याचे उत्तर. 
‘तुझा भाऊ वारंवार असे वागतो का?’’ मी त्याला पुन्हा प्रश्‍न केला. 
‘नाही सर,’’ त्याने पुन्हा उत्तर दिले. 
‘मग?’’ मी पुन्हा विचारले. ‘‘तो काहीवेळा बोलतो, पण माझे मन दुखावते ना,’’ तो दुखावलेल्या स्वरात म्हणाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आता, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. मनुष्याला सतत चांगले आणि नम्रपणे वागणे खूप अवघड असते. तू तरी तुझ्या भावासोबत नेहमी चांगले आणि नम्र वागतो का?’’ 
तो माझ्याकडे काहीही न बोलता आश्‍चर्यचकित होऊन पाहत होता. त्यामुळे, मी माझे बोलणे सुरूच ठेवले. त्याची गरजही होती. 
मी पुढे म्हणालो, ‘‘एखाद्या व्यक्तीचा कधी थोडा तोल जाऊ शकतो. ते ठीक आहे. आज तुझ्या भावाची मनःस्थिती योग्य नव्हती. त्यामुळे शांत राहा. त्याच्याबद्दल संवेदनशीलता बाळग. त्याच्या अशा वागण्याला तू कारणीभूत नसशीलही. त्यामुळे त्याच्यासोबत शांतपणे बस. त्याच्याबरोबर चहा घे. कधीतरी नाराज होणेही साहजिकच. प्रत्येकजण कधीतरी निराश होतो.’’ 
‘तुमच्याबद्दल काय सर?’’ त्याने आता मला प्रश्‍न विचारला. 

‘मी चांगला आहे, म्हणजे सदासर्वकाळ मी चांगला राहू शकतो, असा याचा अर्थ नाही. प्रसंगानुसार कधीकधी माझे वागणेही बदलते. मात्र. मी पुन्हा नेहमीच्या मनःस्थितीत परततो. मी काही मिनिटांपेक्षा अधिक काळ ते मनात धरून ठेवत नाही,’’ मी त्याच्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तर दिले. 
यावर तो विचार करून म्हणाला, ‘‘आणि मला पाहा सर, मी ती गोष्ट ४८० मिनिटांपेक्षा अधिक वेळ मनात धरून ठेवलीय. नाही का?’’ 

आता इतकावेळ निराश असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो हसला. 
आपण लोकांना त्यांचे वागणे आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते, तेव्हा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. मात्र, त्यांचे वागणे पुन्हा पूर्वीसारखे होणार नसेल तर त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले. होय ना? विचार करा. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com