इम्प्रूव्ह युअरसेल्फ : उद्याच्या सुंदर दिवसासाठी....

रमेश सूद
Thursday, 10 September 2020

ही १९८० ची गोष्ट. माझी एकामागून एक स्वप्ने उद्‍ध्वस्त होताना मी पाहत होतो. त्यामुळे मी स्वप्न पाहण्याचेच थांबविले. करिअर किंवा आयुष्याचे कसलेही दीर्घकालीन नियोजन केले नाही. मला मोठे काही करण्याचा मोहही नव्हता. खरे तर एक खेळाडू म्हणून मी वर्तमानकाळावरच लक्ष्य केंद्रित केले. आयुष्य पुढे जात राहिलो. एकेका क्षणाने, एकेका दिवसाने.

ही १९८० ची गोष्ट. माझी एकामागून एक स्वप्ने उद्‍ध्वस्त होताना मी पाहत होतो. त्यामुळे मी स्वप्न पाहण्याचेच थांबविले. करिअर किंवा आयुष्याचे कसलेही दीर्घकालीन नियोजन केले नाही. मला मोठे काही करण्याचा मोहही नव्हता. खरे तर एक खेळाडू म्हणून मी वर्तमानकाळावरच लक्ष्य केंद्रित केले. आयुष्य पुढे जात राहिलो. एकेका क्षणाने, एकेका दिवसाने.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजही मीच त्याच पद्धतीने जगतोय. उगवत्या सूर्याला सुप्रभात करतानाच रात्री झोपताना समाधानही व्यक्त करतो. वर्षानुवर्षे लिंक्डइनवर लिहिण्यासारखीच ही सवयही मला लागलीये. उद्याचा दिवस नेहमीच दयाळू असतो. तो मला प्राप्त करण्यासाठी हळुवारपणे स्वत:ला तयार करतो. ज्याप्रमाणे, तो ‘आज’च्या दिवसामध्ये परावर्तित झाला, अगदी त्याप्रमाणेच.

मी माझ्या संसाधनांमध्ये जगतोय. मोजमाप न करता येणाऱ्या अनेक सुंदर गोष्टी आजूबाजूला पाहतो. त्यांचा आनंद घेतो. या गोष्टींची मला गरजही नाही. माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे मी खुलेपणाने देत राहतो. त्यातूनही एक प्रकारचा आनंद मिळतो. मला हव्या असलेल्या गोष्टी नेहमीच मला योग्य वेळी जादुईरितीने मिळाल्या. काम, मित्र आणि पाठिंब्यासह सर्व गोष्टी. आयुष्यात कधीतरी प्रतिकूल परिस्थितीही निर्माण झाली. मात्र, ती ज्या वेगाने निर्माण झाली, त्याच वेगाने नाहिशीही झाली. मी या सर्व गोष्टी लोकांना सांगतो, तेव्हा ते मला विचारतात, ‘‘हे कसे शक्य झाले?’’ या प्रश्‍नाचे उत्तर माझ्या प्रार्थनेत आहे, ती मी दररोज सकाळी म्हणतो...

हे परमेश्वरा, तुझे खूप आभार
मला जगण्यासाठी आणखी एक सुंदर दिवस दिल्याबद्दल...
माझ्यासोबत येथे आणि आता असल्याबद्दलही तुझे आभार..
आजचा दिवस चांगला बनविण्याचे वचन मी तुला देतो..

ईश्वर कुजबुजतो, आपण एकत्रितरीत्या तो अधिक चांगला बनवू.मी हसतो आणि दिवसाची सुंदर सुरुवात होते. तुमच्या दिवसाची सुरुवातही अशीच होवो. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud on improve yourself