इम्प्रूव्ह युअरसेल्फ : भरारी घेण्यापूर्वी...

Improve-Yourself
Improve-Yourself
Updated on

‘तुमच्या आत्तापर्यंत तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कथा प्रकाशित झाल्या आहेत, मात्र एकाही कथेत मला तुम्ही लोकांना धैर्याची कृती करायला सांगत असल्याचे दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना आशेची झेप घ्यायला किंवा त्यांच्या पंखात बळ भरत असल्याचेही जाणवले नाही. तुम्ही त्यांना प्रोत्साहित करत नाही. असे का?’ एकाने मला थेट प्रश्‍न केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी उत्तर दिले, ‘खरे तर अशा प्रकारे प्रोत्साहन देण्याची मला काळजी वाटते. माझ्या अशा प्रोत्साहनामुळे एक हजार जण प्रेरित झाले तर, त्यापैकी काही जणच भरारी घेण्यासाठी सक्षम होतील. त्यापैकी एक-दोन किंवा फारतर पाच जणच खऱ्या अर्थाने भरारी घेतील. केवळ व्यवसाय वाढवण्यासाठी आणि इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी या पाच जणांचे उदाहरण देऊन उर्वरित ९९५ जणांकडे दुर्लक्ष करणे आणि त्यातून पुढील एक हजार जण मिळवण्याला माझा ठाम नकार आहे. त्याऐवजी मी लोकांना त्यांनी सर्वप्रथम आपल्या पंखांची निर्मिती करावी आणि ते मजबूत होईपर्यंत भरारी घेण्याचा मोह टाळावा, असे सांगणे पसंत करेन.

ता यापैकी किती जण भरारी घेऊ शकतील हाही प्रश्‍न आहेच, कारण यामध्ये नशिबाची भूमिकाही आहे. त्यामुळे अधिक काळ थांबू न शकणारे भरारी घेऊ शकणार नाहीत. ते लवकरच पुन्हा आपल्या मूळ जागेवर सुरक्षितरित्या परत येतील. आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळी प्रेरणा आणि उपजत क्षमता घेऊन येतो. त्यामुळे आपण नेमके कसे पर्याय निवडतो आणि आपल्याला अशी उडी घेण्यापूर्वी कोणते बदल करण्याची गरज आहे, याचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याची मदत होईल. मी याच अवकाशात काम करणे पसंत करतो.’

तो म्हणाला, ‘अनेक व्यावसायिकही अशा प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला विचारले.’

मी म्हणालो, ‘ठीक आहे. प्रत्येक जण वास्तवाच्या आपल्या कल्पनेनुसार काम करत असतो. माझी कल्पना वेगळी असू शकते.’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com